शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

हॉटेलचे ग्राहक पळविल्याचा आरोप; वेटरसह चार जणांना लोखंडी रॉडने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 17:11 IST

याबाबत एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळूज महानगर : हॉटेल व्यवसायातील स्पर्धेतून वेटरसह अन्य चार जणांना लोखंडी रॉडने गंभीर मारहाण करून जखमी केल्याची घटना रविवारी रात्री घडली. दोन गटांमध्ये ही हाणामारी झाली.

याबाबत एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी वेटर बाबासाहेब शेनफड्डू वानखेडे (२१, रा. बजाजनगर) यांनी शहरातील रुग्णालयात आयसीयूत उपचार घेताना वाळूज एमआयडीसी पोलिसांना जबाब दिला. त्यांनी सांगितले की, ते हॉटेल योगराज (प्रताप चौक) येथे आठ महिन्यांपासून वेटर आहेत. रविवारी रात्री ११:३० वाजता हॉटेल बंद करून ते आणि समाधान पाटील, कृष्णा पाटील व हॉटेल मालक नानासाहेब गलांडे असे चौघे जण हॉटेलसमोर उभे असताना सफारी कार (एमएच २० - बीए ०७००) ही जवळ थांबली. गाडीत राजयोग हॉटेलचे मालक राजेंद्र शिंगाडे हे होते. त्यांनी नानासाहेब गलांडे यांना सोबत नेले. शिंगाडे यांनी आम्हा कामगारांना ‘तुमचा कार्यक्रम करतो,’ अशी धमकी दिली. नंतर पाच ते दहा मिनिटांत दुसरी कार आली. त्यातील रोहित शिंगाडे, रोहन शिंगाडे यांच्याजवळ लोखंडी सळया होत्या. रोहित म्हणाला, “तुमच्या मालकाचा गेम झाला आहे. तुम्ही आमचा हॉटेलचा धंदा बंद पाडला आहे,” असे म्हणून सळईने बाबासाहेब याला बेदम मारहाण केली.

डोक्याला गंभीर जखम..बाबासाहेब यांनी सांगितले की, वानखेडे खाली पडल्यावर त्यांनी माझ्या डोक्यात सळईने मारहाण केली. सचिन देशमाने हा मोटारसायकलवर तेथे आला. त्याला सुद्धा रोहन व रोहित शिंगाडे यांनी सळईने मारून गंभीर जखमी केले व ते तेथून त्यांची कार घेऊन निघून गेले. त्यानंतर तेथे जमा झालेल्या लोकांनी वानखेडे व बाबासाहेबला घाटी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर मालक नानासाहेब गलांडे यांनी खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले. वानखेडे व बाबासाहेब यांना डोक्याला गंभीर जखम असल्याने चौदा ते पंधरा टाके पडले आहेत. तपास सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर