४ वर्षापूर्वी सिडकोने मुकुंदवाडी येथील स्मशानभूमीलगत ख्रिस्ती दफनभूमीसाठी दिलेल्या जागेचा इतरांनी ताबा घेतल्यामुळे एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तसेच क्रांती चौक परिसरातील ऐतिहासिक दफनभूमी कोणीतरी बुलडोजरने उद्ध्वस्त केली असता क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्या जागेचा ताबा पुन्हा ख्रिस्ती समाजाला देण्यात आला होता.
चौकट _१
कोरोनाच्या काळात सरासरीच्या चौपट मृत्यू
रेकॉर्डनुसार आतापर्यंत दरवर्षी १५ ते २० ख्रिस्ती लोकांचे निधन झाले आहे. यापूर्वी १८५५
साली प्लेगच्या महामारीने, वृद्धापकाळाने व अन्य कारणाने सर्वाधिक ३४ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र मागील एकाच वर्षात सरासरीच्या चौपट म्हणजे १७९ लोकांचे निधन झाले.
चौकट _२
प्रक्रिया पूर्ण होऊनही मिळाला नाही ताबा
ख्रिस्ती कृती समितीचे अध्यक्ष विजय उर्फ गुड्डू निकाळजे यांनी दिलेल्या माहितीनुसार कृती समितीसह, माजी नगरसेवक जेेम्स आंबीलढगे आणि सर्व पंथीय ख्रिस्ती धर्मगुरूंनी दफनभूमीसाठी जागा मिळावी म्हणून शासनाला वारंवार निवेदने दिली आहेत. २००६ पासून आतापर्यंत ४ वेळा मनपा, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणही केले आहे.
तत्कालीन केंद्र शासनाच्या महाराष्ट्राच्या प्रभारी मार्गारेट अल्वा यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांसोबत स्थानिक धर्मगुरू आणि समितीच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भावसिंगपुरा लगतच्या गट नंबर ९ मधील ३ एकर जागा ख्रिस्ती दफनभूमीसाठी देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. यासाठी महापालिकेने ना हरकत प्रमाणपत्र आणि तेथे कुठलेही आरक्षण नसल्याचे सांगितले होते. यासाठी मनपाने काही वर्षांपूर्वी ४५ लाख रुपयांची तरतूदही केली होती. अशी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मात्र अद्यापपर्यंत हे प्रकरण थंड बस्त्यात पडले आहे.