शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

काळाच्या ओघात अंतरपाटही बदलला;‘प्रिंटेड’ डिझायनर अंतरपाटाने सोहळा अविस्मरणीय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 7:05 PM

लग्न असो वा मुंज; अंतरपाटाशिवाय मंगलाष्टक सुरूच होत नाही.

औरंगाबाद : नवरा-नवरी यांच्यामध्ये अंतरपाट धरल्याशिवाय मंगलाष्टक सुरू होत नाही, एवढे महत्त्व अंतरपाटाला असते. काळाच्या ओघात आता अंतरपाटही प्रिंटेड झाले आहेत.

साध्या अंतरपाटाला आता कोणी खरेदीदार मिळत नाही. हा बदल लग्नसराईत बघण्यास मिळत आहे. लग्न असो वा मुंज; अंतरपाटाशिवाय मंगलाष्टक सुरूच होत नाही. आजही रूढी परंपरा कायम टिकून आहेत. आधी कापडी अंतरपाट ‘प्लेन’ असत. त्यावर गुरुजी हळदी, कुंकवाने स्वस्तिक साकारत आणि मग तो अंतरपाट धरला जात असे. काळ बदलत आहे. त्यानुसार आता साध्या प्लेन अंतरपाटही डिझायनर झाला आहे. रेशमी अंतरपाटावर स्वस्तिक, वरात, मंगल कलश, वधू-वराचे प्रतीकात्मक छायाचित्र, शुभ-लाभ, शुभ विवाह, सनई-चौघडावादन असे प्रिटिंग केले जात आहे. हेच अंतरपाट आता खरेदी केले जात आहेत.

लग्नाचे सर्व नियोजन आता इव्हेंट मॅनेजमेंटकडे गेल्याने. लग्नात लागणाऱ्या प्रत्येक साहित्यात नावीन्यता, कल्पकता आणली जात आहे. अविस्मरणीय सोहळा होण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले जात आहे. त्यात आता अंतरपाटही सुटले नाहीत. तेही डिझायनर झाले आहेत, अशी माहिती डिझायनर नीलेश मालानी यांनी दिली.

अंतरपाटाची लांबी रुंदीलग्नात किंवा मुंजीत वापरण्यात येणाऱ्या अंतरपाटाची लांबी रूंदी ४ बाय ५ फूट व ४ बाय ६ फुटांची असते.

अडीच हजारांपर्यंत अंतरपाटलग्न-मुंजीसाठी अंतरपाटाची किंमत ३०० रुपये ते ११०० रुपये दरम्यान असते. काही हौशी लोक अंतरपाटाला असे सजवितात की, अडीच हजार रुपयांपर्यंतही खर्च जातो.

शिल्लक लग्नतिथीएप्रिल- १५, १७, १९, २१, २४, २५. मे- ४, १०,१३,१४, १८, २०, २१, २२, २५, २६, २७. जून- १, ६,८,११,१३, १४,१५, १६, १८, २२.जुलै- ३, ५, ६,७,८,९.

मुंजीच्या तिथीएप्रिल - ६, ११, १३, २१.मे- ५,६,११,१८.जून- १, २, १६.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmarriageलग्न