लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पोलीस अधिकाºयांच्या बदल्यांमुळे ‘कहीं खुशी कहीं गम’ वातावरण असून, नाराज अधिकाºयांनी शुक्रवारी आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे आपले गा-हाणे मांडले. आहे त्या ठिकाणी ठेवा अन्यथा योग्य नियुक्ती द्या, अशी मागणी काहींनी केल्याची माहिती आहे.पोलीस निरीक्षक दादाराव शिनगारे यांची उस्मानपुरा पोलीस ठाण्यातून सिटीचौक पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. निर्मला परदेशी मनपा अतिक्रमण हटाव पथकातून सिडको पोलीस ठाण्यात, श्रीपाद परोपकारी क्रांतीचौकातून छावणी ठाण्यात तर श्यामसुंदर वसूरकर यांची मुकुंदवाडीहून जिन्सी ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक हनुमंतराव गिरमे यांना सिडको वाहतूक शाखेतून काढून क्रांतीचौक ठाण्यात तर शरद इंगळे यांना नियंत्रण कक्षातून जवाहरनगर ठाण्यात बदली करण्यात आली आहे. प्रल्हाद घोडके यांची नियंत्रण कक्षातून उस्मानपुरा ठाणे येथे तर नाथा जाधव यांची सुरक्षा विभागातून सातारा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. भारत काकडे यांची सातारा ठाण्यातून शहर वाहतूक शाखेत आणि मुकुंद देशमुख यांची छावणी ठाण्यातून छावणी वाहतूक शाखेत बदली करण्यात आली. कैलास प्रजापती यांची सिडकोच्या वाहतूक शाखेतून सिडको ठाण्यात तर रामेश्वर रोडगे यांची वाहतूक शाखा छावणीतून सुरक्षा विभागात बदली करण्यात आली आहे. इंदल बहुरे यांची नियंत्रण कक्षातून मनपा अतिक्रमण हटाव पथकात आणि मधुकर सावंत यांची शहर वाहतूक शाखेतून गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.काही अधिकाºयांंची त्यांनी पूर्वी काम केलेल्या जागेवरच बदली झाली आहे. काहींच्या कमी कालावधीत अनेक वेळा बदल्या झाल्या आहेत.पोलीस आयुक्त प्रसाद, उपायुक्त डॉ.दीपाली घाडगे, विनायक ढाकणे आणि राहुल श्रीरामे या समितीने गुरुवारी दिवसभरात ६२ अधिकाºयांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पाडली. बदल्यांचे आदेशही गुरुवारी सायंकाळपर्यंत निघाले. यामध्ये १४ पोलीस निरीक्षक, ९ सहायक पोलीस निरीक्षक आणि ३९ पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. बदली झालेल्या अधिकाºयांना ३१ मे रोजी सायंकाळी कार्यमुक्त करण्याचे आणि १ जून रोजी सकाळी बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेशही पोलीस आयुक्त प्रसाद यांनी दिले आहेत.सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या४सहायक पोलीस निरीक्षक राहुल खटावकर यांची मुकुंदवाडीतून सायबर सेल, साईनाथ गिते यांची मुकुंदवाडीहून जिन्सी, अशोक आव्हाड यांची पुंडलिकनगरहून बेगमपुरा, विवेक पेन्शनवार यांची नियंत्रण कक्षातून क्रांतीचौक, देवचंद राठोड यांची सिटीचौकातून मुकुंदवाडी, वामन बेले यांची मुकुंदवाडीहून सातारा, विजय घेरडे यांची क्रांतीचौकातून एमआयडीसी वाळूज, शेख अकमल यांची क्रांतीचौकातून शहर वाहतूक शाखेत बदली झाली आहे. पैरवी विभागातील दीपाली निकम यांना एक वर्षीची मुदतवाढ देण्यात आली आहे.
बदल्यांमुळे औरंगाबाद पोलीस अधिकाऱ्यांत कहीं खुशी कहीं गम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 12:43 AM
पोलीस अधिकाºयांच्या बदल्यांमुळे ‘कहीं खुशी कहीं गम’ वातावरण असून, नाराज अधिकाºयांनी शुक्रवारी आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे आपले गा-हाणे मांडले.
ठळक मुद्देआयुक्तांकडे काहींची गाºहाणी : आहे त्या ठिकाणी ठेवा अन्यथा योग्य नियुक्ती द्या