औरंगाबाद : जिल्ह्यात शासकीय आणि खासगी रुग्णालये मिळून ३३ टन ऑक्सिजनची मागणी आहे. खासगी रुग्णालयांना २०.२८ टन तर शासकीय रुग्णालयांना १३.६१ टन एवढी ऑक्सिजनची मागणी असून सद्यस्थितीत मागणीच्या तुलनेत पुरेसा ऑक्सिजन साठा असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.
रेमडेसिविरच्या २०० डोसचा पुरवठा
औरंगाबाद : रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर कमी होत असल्याचा दावा केला जात असला तरी बुधवारी शहरात २०० इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, मेल्ट्रॉन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये रेमडेसिविर उपलब्ध आहे. खासगी रुग्णालयाला मागणीप्रमाणे जिल्हा प्रशासन इंजेक्शन उपलब्ध करुन देत आहे.
१३.२८ टक्के नागरिकांना लस
औरंगाबाद : जिल्ह्यात आजवर ४४ वर्षांवरील १३.२८ नागरिकांना लस देण्यात आली आहे. ४ लाख ३६ हजार ६७६ इतके ते प्रमाण आहे. तर १ लाख १२ हजार ७३७ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १ मेपासून १८ ते ४४ वर्षापर्यंतच्या ३२ लाख ८७ हजार ८१४ नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे.