लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगामातील पीकविमा भरण्यासाठी मागील चार दिवसांपासून शेतकºयांची बँका आणि सेवा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शुक्रवारी आॅफलाईन विमा प्रस्ताव स्वीकारण्याचे आदेश मिळाल्यानंतर शनिवारी सकाळच्या प्रहरात जिल्ह्यात काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे यंत्रणा विस्कळीत झाली.दरमान, आतापर्यंत अडीच लाख शेतकºयांचा पीकविमा भरुन घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली असलीतरी दुजोरा मिळाला नाही. पीकविमा भरण्यासाठी निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागल्याने शनिवारी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. तर रात्री उशिरापर्यंत रांगा लागलेल्या होत्या.रविवारी सुटी असूनही पीकविमा भरुन घेतला जाणार आहे. त्यामुळे पीकविमा भरण्यासाठी ‘संडे आॅनलाईन’ राहणार आहे. पुढील दोन दिवसांमध्ये कामकाजात आणखी सुधारणा दिसून येणार आहे.शासनाचे पीकविम्याचे पोर्टल डिसेबल झाल्यामुळे पीकविमा स्वीकारण्यासाठी येणाºया अडचणी लक्षात घेत जिल्हा बँकेला आॅफलाईन सॉफ्टवेअर उपलब्ध झाले. त्यानुसार आॅफलाईन सॉफ्टवेअर बँकेच्या ५९ शाखांमध्ये डाऊनलोड केल्यानंतर पीकविमा भरण्याची प्रक्रिया सुरळीत सुरु झाली. जिल्ह्यातील एकही शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्यात आली असून, जिल्हा बँकेच्या शाखा रविवारी सुध्दा रविवारी सुरु राहणार असल्याचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी सांगितले.आॅफलाईन पद्धतीने पीकविमा भरण्यासाठी शेतकºयांच्या रांगा दिवसभर पहावयास मिळाल्या. दरम्यान, आष्टी येथील डीसीसी शाखेसमोर रात्री दहा वाजेपर्यंत शेतकºयांची गर्दी होती. पोलीस घटनास्थळी आले होते, तर गढी येथील शाखेसमोर काही शेतकरी गावावरुन आणलेले डबे खात होते.
पीकविम्यासाठी संडे आॅनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 1:00 AM