- राम शिनगारेऔरंगाबाद : देशातील नद्यांमध्ये अतिशय हिंस्र अशा पिराना माशाचे अस्तित्व असल्याचा दावा होत आहे. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पॉल हेबर्ट सेंटर फॉर डीएनए बारकोंडिग अॅण्ड बायोडायव्हर्सिटी स्टडीज् केंद्राने भारतात हिंस्र पिराना नव्हे, तर शाकाहारी पाकू माशाचे अस्तित्व असल्याचे शोधले आहे.ब्राझीलच्या पॅराग्वे नदीत पिराना (पायगोसेंट्रस नाट्टारेरी)चे अस्तित्व आहे. हा मांसाहारी असून, अन्न न मिळाल्यास कोणावरही हल्ला करतो. जनावरे, माणसांवरही हल्ला चढवतो. त्यामुळे पाण्यामध्ये इतर प्रजातींचे जगणे कठीण होते. हा मासा भारतात असल्याचा दावा २०१२ पासून होत होता.विद्यापीठाच्या डीएनए बार-कोडिंग केंद्राने याच ठिकाणाहून पिरानासारख्या दिसणाऱ्या माशाचे नमुने गोळा केले. केंद्राचे संचालक डॉ. गुलाब खेडकर यांच्या टीमने वरील नद्यांतून हे नमुने देशभरातून जमा करून त्यावर संशोधन केले.पिरानाचे गुणधर्म, प्रवृत्ती व रचना याच्याशी या माशांची तुलना केली. पिराना मांसाहारी असून, भारतातील मासा शाकाहारी असल्याचे स्पष्ट झाले. भारतातील मासा हा ब्राझीलमधील अमेझॉन नदीत सापडणारा पाकू (पायरॅक्टस् ब्राचीकोमस) असल्याचे स्पष्ट झाल्याचे संचालक डॉ. खेडकर यांनी सांगितले. अमेरिकेतील जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.
(पिराना)