लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : येथील पंचायत समिती कार्यालयात कामचुकार, तळीराम कर्मचाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाºयांचा कोणताही वचक राहिला नसल्याने कर्तव्यावर थेट मद्यप्राशन करून येत आहेत. गुरूवारी लेखा विभागातील एकाने हैदोस घालीत कार्यालय डोक्यावर घेतल्याचे गंभीर चित्र पहावयास मिळाले.येथील पं.स.त प्रामुख्याने चतुर्थ श्रेणी पदावरुन पदोन्नती झालेले, विविध कारणामुळे निलंबित कर्मचारी व अकार्यक्षम असलेल्यांना नियुक्ती दिल्याचा आरोप अनेकदा होतो. त्यामुळे पं.स.त कामचुकार, दांडीबहाद्दर, कर्तव्यावर थेट मद्यप्राशन करून ‘दादा’गिरी करणाºया कर्मचाºयांच्या संख्येत वाढ झाली आहे. या प्रकाराला सर्वसामान्य नागरिक, सरपंच, ग्रामसेवकही वैतागले आहेत. परंतु या कर्मचाºयांवर कारवाईचे धाडस वरिष्ठ अधिकारीही दाखवत नसल्याने त्यात मोठी वाढ झाली आहे.गुरूवारी प्रस्तुत प्रतिनिधीने दुपारी १२ च्या दरम्यान पंचायत समितीच्या लेखा विभागास भेट दिली असता एक लिपीक अत्यंत मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालत असल्याचा प्रकार निदर्शनास आला. त्याने कार्यालय अक्षरश: डोक्यावर घेतले असल्याचे चित्र होते. सदर कर्मचारी राजरोसपणे कार्यालयात मद्यप्राशन करून येत असल्याच्या तक्रारी यापूर्वी अनेक नागरिकांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केल्या; परंतु कारवाई शून्य आहे.
तळीराम लिपिकाचा पं.स.त हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:50 AM