छत्रपती संभाजीनगर : मोठ्या रकमेचा व्यवहार रोज लाखो जण करतात. आपण जर करचुकवेगिरी केली तर कोणाच्या लक्षात येणार आहे. असा तुमच्या मनात चुकूनही विचार आणून नका. कारण, तुमच्या खिशात ‘पॅन कार्ड व आधार कार्ड’ असे आयकर विभागाचे दोन गुप्तहेर बसलेले आहेत. याच गुप्तहेरांच्या साह्याने आयकर विभाग तुमच्या दैनंदिन व्यवहाराची माहिती प्राप्त करीत आहे. यामुळे व्यवहार करताना सावधान रहा, करचुकवेगिरी केली तर कधीही पडू शकतो आयकरचा छापा.
आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा वापरआयकर विभाग तंत्रज्ञानाच्या बाबतीत अपग्रेड झाले आहे. करचुकव्यांना पकडण्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजेन्स’ (एआय)ची मदत घेतली जात आहे. पॅन व आधार कार्ड हे त्यांचे गुप्तहेर सारखे काम करीत असून, त्यास टीन व टैन हे सहाय्यक गुप्तहेर म्हणून सहकार्य करीत आहेत. कर चुकवणाऱ्यांची सर्व कुंडली ‘एआय’ अधिकाऱ्यांसमोर सादर करीत आहे. हे सीबीडीटीचे ‘रिस्क मॅनेजमेंट स्ट्रेटजी पालिसी (फ्लैग) द्वारा सर्व प्रणाली कार्य करीत आहे.
एका क़्लिकवर मिळते सर्व माहितीआयकर विभागातील सुत्रांनी सांगितले की, ‘आर्टिफिशियल इंटेलिजेन्स’ आमच्यासाठी वरदान ठरत आहे. बँका त्यांच्याकडील मोठ्या रकमेच्या व्यवहाराची माहिती सस्पिशयस ट्रांजेक्शन रिपोर्ट (एसआरटी) द्वारा आयकर विभागाला दररोज पाठवितात. ‘आर्टिफिशियल इंटेलिजेन्स’ वर्गवारी करून जिथे करचुकवेगिरी झाली, त्याची यादी आयकरच्या सिस्टीमवर डाउनलोड करते. अधिकारी कामावर आले की, एका क्लिकवर त्यांना सर्व यादी मिळते. त्यानंतर करचुकवेगिरी करणाऱ्यांना नोटीस पाठविली जाते.
सोने, घर खरेदी करा की, विदेश यात्रा वा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक२ लाखांपेक्षा अधिक रकमेचे सोने खरेदी करा किंवा ३० लाखांपेक्षा अधिक रकमेचे घर खरेदी असो, की, विदेश यात्रेवर १० लाखांपेक्षा अधिक खर्च झाला असेल, वा १० लाखांपेक्षा अधिक म्युचुअल फंडात गुंतवणूक, ५० लाख रोख डिपॉझिट तुमच्या व्यवहाराची माहिती लगेच आयकर विभागाकडे पोहोचते. एखाद्याकडे दोन पॅन कार्ड असतील तर त्याला दंड करण्याची तरतूद आहे. याला ट्रेसआऊट करण्यासाठी आयकर विभागाची यंत्रणा अलर्ट असते.