शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

पंकजांना धक्का; कृउबा राकाँकडे

By admin | Published: May 15, 2017 11:41 PM

परळी : येथील प्रतिष्ठेच्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सोमवारी राष्ट्रवादी- काँग्रेसच्या पॅनलने भाजप पॅनलचा अक्षरश: धुव्वा उडवला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : येथील प्रतिष्ठेच्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सोमवारी राष्ट्रवादी- काँग्रेसच्या पॅनलने भाजप पॅनलचा अक्षरश: धुव्वा उडवला. राकॉ- काँग्रेसने १८ पैकी १४ जागांवर दणदणीत यश मिळविले. भाजपच्या पदरात अवघ्या चार जागा पडल्या. या विजयाने धनंजय मुंडे यांनी कृउबातील वर्चस्व अबाधित राखले असून पंकजा यांना मात्र, पालिका, जि.प.- पं. स. पाठोपाठ कृउबामध्येही दारुण पराभवाचा सामना करावा लागला. धनंजय मुंडे यांनी काँग्रेसचे प्रा. टी.पी. मुंडे, संजय दौंड यांना सोबत घेऊन आघाडी स्थापन केली होती. तर भाजपने स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणे पसंद केले होते. संचालकपदाच्या १८ जागांसाठी मुंडे बंधू- भगिणीच्या पॅनलमध्ये थेट सामना झाला. सहा अपक्षांनीही नशीब आजमावले. राकॉ- काँग्रेस आघाडी प्रणित स्व.पंडितअण्णा मुंडे शेतकरी विकास पॅनलचे १४ उमेदवार विजयी झाले, तर भाजपच्या स्व. गोपीनाथराव मुंंडे शेतकरी विकास पॅनलने अवघ्या चार जागा पटकावल्या. रविवारी ८ केंद्रांवर १९१३ पैकी १८४७ मतदारांनी हक्क बजावला होता. सोमवारी सकाळी जि.प. कन्या प्रशालेच्या इमारतीत मतमोजणीला प्रारंभ झाला. तीन तासात मतमोजणी प्रक्रिया संपली. सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या राकॉ- काँग्रेसच्या पॅनलने शेवटपर्यंत सरशी कायम राखत १४ जागांवर विजय मिळविला. सर्व उमेदवार चांगल्या फरकाने विजयी झाले.स्व. अण्णांना विजय समर्पित - धनंजय मुंडे विजयानंतर जगमित्र संपर्ककार्यालयातील स्व.पंडितअण्णा मुंडे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन धनंजय मुंडे यांनी अभिवादन केले. जिवाला जीव देणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच हा विजय शक्य झाल्याचे ते म्हणाले. स्व. पंडितअण्णांनी चेअरमन म्हणून केलेल्या कार्याची मतदारांनी पावती दिली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. भाजपने या निवडणुकीत प्रचंड धनशक्तीचा, सत्तेचा वापर करूनही मतदारांनी आपल्याला कौल दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी, हमाल- मापाड्यांना न्याय देण्याचे काम आपण यापुढेही करु असे ते म्हणाले. हा विजय स्व. पंडित आण्णांना समर्पित करत असल्याचे भावोद्गार त्यांनी काढले.