शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

विद्यापीठाच्या 'त्या' परीक्षा केंद्रावरील पेपर पुन्हा होणार: उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 3:23 PM

महाविद्यालयातील परीक्षा केंद्र रद्द करण्यात आल्याची माहिती प्र-कुलगुरू शाम शिरसाट यांनी केली.

औरंगाबाद: शहरातील एका परीक्षा केंद्रात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी आल्याने पदवीच्या पहिल्याच पेपरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नियोजनाचा सावळागोंधळ दिसून आला. यामुळे एका बेंचवर तीन तीन विद्यार्थी परीक्षा देत होते. या गोंधळाची गंभीर दखल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतली असून २४ तासांत दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी घोषणा केली. 

कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत. कालपासून परीक्षा सुरु झाल्या आहेत. बुधवारी पहिल्या दिवशी  बॅकलाॅगचा पेपर असल्याने विद्यार्थी संख्या कमी होत. मात्र, आज नियमित पेपरच्या नियोजनातील विद्यापीठाचा गोंधळ पुढे आला. शहरातील एका महाविद्यालयात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र देण्यात आले. यामुळे आज सकाळी ९ वाजता पहिल्या पेपरला जवळपास ११००  विद्यार्थी महाविद्यालयात धडकले. अतिरिक्त विद्यार्थी आल्याने केंद्रावर एकच गोंधळ उडाला. तीन तीन परीक्षार्थ्याना एकाच बेंचवर बसविण्यात आले. तसेच उपलब्ध जागेत खुर्च्या टाकून परीक्षार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली. तरीही २०० विद्याथी अतिरिक्त ठरले. अशा गोंधळाच्या वातावरणात दाटीवाटीने परीक्षा घेण्यात आली. या गोंधळाची गंभीर दाखल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. 

या केंद्रावरील पेपर पुन्हा होणार या केंद्रावर बीएस्सी संगणक शास्त्र, बायोटेक आणि आयटी या विषयांचे पेपर होते. झालेल्या गोंधळामुळे या केंद्रावरील पेपर पुन्हा घेण्यात येणार असल्याची घोषणा देखील मंत्री सामंत यांनी केली. 

केंद्रावर प्र-कुलगुरू, परीक्षा नियंत्रकांची भेटअपुऱ्या बैठक व्यवस्थेमुळे गोंधळ उडाल्याची माहिती मिळताच प्रभारी परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक गणेश मंझा, प्र- कुलगुरू शाम सिरसाट यांनी केंद्रावर भेट दिली. महाविद्यालयाची क्षमता ६०० असताना ११०० विद्यार्थी कसे आले याची माहिती घेण्यात येत असल्याचे मंझा यांनी सांगितले. तर या महाविद्यालयातील परीक्षा केंद्र रद्द करण्यात येत असल्याची माहिती प्र-कुलगुरू सिरसाट यांनी दिली. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद