लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात २५ सप्टेंबर रोजी अंगणवाडी सेविकांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी संपावर ठाम राहण्याचा निर्धार करण्यात आला.जिल्ह्यातील १६६३ अंगणवाड्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस ११ सप्टेंबरपासून मानधनात वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी संपावर गेल्या आहेत. परंतु, शासनाने काही संघटनांना हाताशी धरुन तुटपुंजी वाढ करुन संप मागे घेण्याचे आवाहन केल्याचा आरोप या संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात शासनाने केलेली तुटपुंजी मानधनवाढ नाकारुन संपावर ठाम राहण्याचा निर्धार करण्यात आला. या मेळाव्यास जिल्हाध्यक्ष बाबाराव आवरगंड, भगवानराव देशमुख, इंदू तारे, महानंदा फड, आशा राठोड, सुनीता कानडे, मनोरमा धुमाळ, जयश्री लोखंडे, वनिता कदम, सविता पंचांगे, लताबाई चेरेकर, विमल रोडगे, कविता देशमुख, छबूताई काळे आदींसह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
परभणीत अंगणवाडी सेविकांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:16 AM