लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आगामी सण व उत्सव साजरे व्हावेत, यासाठी कोतवाली पोलीस ठाण्याच्या वतीने कोबिंग आॅपरेशन राबवून उपद्रवी ठरणाºया ११ आरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.गणेशोत्सव व आगामी सण शांततेत साजरे व्हावेत, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोेख बंदोबस्त ठेवला जात आहे. या अनुषंगाने सण व उत्सवात उपद्रवी ठरणाºया आरोपीविरुद्धही कारवाई केली जात आहे.कोतवाली पोलीस ठाण्याच्या वतीने पोनि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील साखला प्लॉेट, भीमनगर, अजीजीयानगर आदी भागामध्ये कोबिंग आॅपरेशन राबविण्यात आले. यामध्ये रोख ७ हजार ५५० रुपये व चार आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. कोबिंग दरम्यान वॉरंट असलेले १० व एका फरार आरोपीस पकडण्यात आले.या कारवाईमध्ये दोन वाहनांसह २० पोलीस कर्मचाºयांनी सहभाग घेतला.
परभणीत कोबिंग आॅपरेशन; दहा आरोपी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:23 AM