लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील प्रश्नांसंदर्भात उद्योग मित्र समिती व जिल्हा सल्लागार समिती सदस्यांची बैठक बुधवारी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़यावेळी आयुक्त राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांची प्रमुख उपस्थिती होती़ परभणीत औद्योगिक क्षेत्राकरीता वाढीव क्षेत्र म्हणून मौ़ बाभळगाव येथील २६४ हेक्टर जमीनीची संयुक्त मोजणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने केली असून, भूमीअभिलेख विभागाकडून मोजणी अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही केली जाणार आहे़, अशी माहिती यावेळी देण्यात आली़ बैठकीस रामेश्वर राठी, निलेश बिनायके, प्रमोद वाकोडकर, राजेंद्र पोखर्णा, पी़एम़ पोखर्णीकर, अमीत कोटेचा यांच्यासह उद्योग, महावितरण, समाजकल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते़
उद्योग समितीची परभणीत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:23 AM