लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर परतूर, भोकरदन तालुक्यात रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. कोमेजू लागलेल्या पिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला.परतूर शहरासह मसला, बाबई, अंबा, डोल्हारा, रोईना परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजता पावसाला सुरुवात झाली. अर्धातास काही भागात हलका ते मध्यम पाऊस झाल्यामुळे पिकांना जीवनदान मिळाले. भोकरदनसह वाडी, सुरंगळी, आन्वा, दानापूर, पळसखेडा, कठोराबाजार, मलकापूर, बोरखेडा, मनापूर परिसरात साडेपाच्या सुमारास पाऊस पडला. जालना तालुक्यातील काही भागात तूरळक पाऊस झाला. बदनापूर, मंठा, अंबड, जाफराबाद तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. दरम्यान, जिल्ह्यात आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आहे. सकाळी ढग दाटून आल्यानंतर काही क्षणात जोरदार पाऊस होईल, असे वाटत असतानाच ढग हुलकावणी देत असून कडक ऊन पडत आहे. जिल्ह्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
परतूर, भोकरदन तालुक्यांत पाऊस
By admin | Published: July 17, 2017 12:44 AM