शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पर्युषण पर्वाला आजपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:59 AM

जैन धर्मातील पवित्र पर्युषण पर्वाला उद्या १८ आॅगस्टपासून प्रारंभ होत आहे. पुढील नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन शहरात करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जैन धर्मातील पवित्र पर्युषण पर्वाला उद्या १८ आॅगस्टपासून प्रारंभ होत आहे. पुढील नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन शहरात करण्यात आले आहे.श्वेतांबर वर्धमान जैन सेवा संघसिडको एन-३ येथील श्वेतांबर वर्धमान जैन सेवा संघाच्या वतीने १८ ते २७ दरम्यान पर्युषण महापूर्व आराधना करण्यात येणार आहे. येथील शंखेश्वर पार्श्वनाथ जैन जिनालयामध्ये दररोज सकाळी ६ वाजता शहनाई वादन, त्यानंतर भगवंतांचा अभिषेक, आरती. केशरबाग सभागृहात साध्वीजी शासनदीपिका सुयशाश्रीजी म. सा. आदिठाणा ४ यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८.३० वाजता सूत्रवाचन, ९.१५ ते १०.१५ प्रवचन. दुपारी कल्पसूत्र, धार्मिक स्पर्धा, सायंकाळी प्रतिक्रमण भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे. २७ रोजी सामूहिक क्षमापना कार्यक्रमाने पर्युषण पर्वाची सांगता होईल, अशी माहिती श्वेतांबर वर्धमान जैन सेवा संघाच्या वतीने देण्यात आली आहे.विमलनाथ नवग्रह जैन मंदिरजाधवमंडी येथील विमलनाथ नवग्रह जैन मंदिर येथे १८ पासून पर्युषण पर्वाला सुरुवात होत आहे. आचार्य देवचंद्रसागर सुरीश्वर म. सा., पंन्यास प्रवर दिव्यचंद्रसागरजी म. सा., मुनीश्री मन्मितसागरजी म. सा. व साध्वीश्री पुष्पदंताश्रीजी म. सा. आदिठाणा ५ यांच्या मार्गदर्शनानुसार महापर्व साजरे करण्यात येणार आहे. दररोज सकाळी ६ वाजता मंगल दर्शन, अभिषेक, ९ वाजता प्रवचन, सायंकाळी प्रतिक्रमण आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. २५ रोजी पर्युषण महोत्सवाची सांगता होणार आहे.आनंदजी- कल्याणजी जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने जोहरीवाडा येथील गोडीजी पार्श्वनाथ श्वेतांबर जैन मंदिर येथे पर्युषण पर्व साजरे करण्यात येणार आहे. दिव्यचंद्रसागरजी म. सा. व मुनीश्री मन्मितसागरजी म. सा. यांच्या मार्गदर्शनाखाली अष्टानिका प्रवचन व जन्मवाचन व प्रज्ञाश्रीजी म.सा. व अर्केन्दूश्रीजी म. सा. आदिठाणा २ यांच्या मार्गदर्शनाखाली पर्युषण पर्व होणार आहे. १८ रोजी भगवंतांच्या अभिषेकाने धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.