छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने महिलांना प्रवास भाड्यात सवलत देण्याचे जाहीर केल्यानंतर गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील प्रवासी संख्येत तब्बल एक कोटीने वाढ झाली आहे. उत्पन्नातही वाढ झाली. कोरोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षांनंतर प्रथमच विभाग नफ्यात आला. मात्र, नव्या बसची संख्या वाढण्याऐवजी जुन्या बसची संख्या कमी झाल्याची चिंतादायक परिस्थिती आहे. नव्या बसची नुसती प्रतीक्षाच प्रवाशांना करावी लागत आहे.
महाराष्ट्र राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी मोठी घोषणा केली होती. एसटीच्या सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. १७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. या सवलतीसह यापूर्वीच्या अनेक सवलतींही एसटी बसमध्ये दिल्या जातात. प्रवासी संख्या वाढल्याने एसटी महामंडळाचा छत्रपती संभाजीनगर विभाग नफ्यात आला आहे; परंतु प्रवाशांना गर्दीतूनच प्रवास करावा लागत आहे. कारण बसची संख्या वाढण्याऐवजी कमीच होत आहे. भंगार बस ‘स्क्रॅब’ करण्यात आल्या.
जिल्ह्यातील बसची स्थिती२०१९ मध्ये एकूण किती बस : ६१३२०२४ मध्ये एकूण किती बस : ५३०
वर्षभरात २३ गेल्या, २५ दिल्यागेल्या वर्षभरात २३ बस ‘स्क्रॅप’ झाल्या. तुलनेत ५ ई- बस, १० ‘लाल’ बस आणि १० एशियाड बस विभागाला मिळाल्या.
प्रवासी संख्या- २०२२ ते २३ : ३ कोटी ९२ लाख ८१ हजार- २०२३ ते २४ : ५ कोटी १ लाख ३७ हजार
उत्पन्नाची स्थिती (छत्रपती संभाजीनगर विभाग)- २०२१-२२ मध्ये ७८ कोटींचा तोटा- २०२२-२३ मध्ये ६९ कोटींचा तोटा- २०२३-२४ मध्ये ११ कोटींचा नफा
ई- बस येणार; पण कधी?छत्रपती संभाजीनगरला २१६ ई- बस प्रस्तावित आहेत. यात पहिल्या टप्प्यात ७८ ई- बस मिळणार असल्याचे सांगण्यात येते. विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर म्हणाले, विभागाला लवकरच पहिल्या टप्प्यातील ई-बस मिळतील. विभाग नफ्यात आला आहे, ही जमेची बाजू आहे.