पैठण तहसील कार्यालयात गौण खनिज अधिकारी व खदान मालकांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना उपरोक्त आदेश दिल्याने खदान मालकात खळबळ उडाली आहे. तालुक्यात अनेक खदानी असून या खदानीत मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन करून बिनबोभाट वाहतूक सुरू होती. उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांनी खडीची वाहतूक करण्यासाठी पास अनिवार्य केल्याने या प्रकारास आळा बसणार आहे. पैठण तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांनी खदान मालक व गौणखणिज अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन खदान मालकांनी
शासकीय वसुलीचा तात्काळ भरणा करावा असे आवाहन केले.
बैठकीस तहसीलदार चंद्रकांत शेळके, जिल्हा गौण खनिज अधिकारी डॉ. अतुल दौड आदी हजर होते. दरम्यान सोमवारी मंडळ अधिकारी शशिकांत ठेंगे, तलाठी एस. एम. बांगर यांनी बिडकीन, चितेगाव परिसरात खडीच्या गाड्या थांबवून तात्काळ पासेस हस्तगत करुन वापर सुरु करावा असे आवाहन केले.
कोट
गौण खनिज विभाग पासेस देणार
अवैध गौणखनिजाची लूट थांबविण्यासाठी वाहतूक पासेस पुरविण्यात याव्यात असे जिल्हा गौण खनिज अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे. यामुळे प्रशासनाला अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल.
-अनमोल सागर,
उपविभागीय अधिकारी पैठण.