औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अखेर घाटी रुग्णालय परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. सध्या केवळ खड्डेमय रस्त्यावर पॅचवर्क केले जाणार असून, संपूर्ण रस्त्याच्या कामासाठी प्रतीक्षाच करावी लागण्याची चिन्हे आहेत.
घाटीत खड्डेमय रस्त्यामुळे एका विभागातून दुसऱ्या विभागात स्ट्रेचरवरून रुग्ण हलविण्यासाठी कर्मचारी आणि नातेवाईकांना कसरत करावी लागते. ‘घाटीतील रस्त्यावरू न स्ट्रेचर ढक लणे अवघड’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने २० नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित क रून रस्त्याची ही अवस्था समोर आणली. घाटीत प्रवेशद्वारापासून खड्डेमय रस्त्याने रुग्णांचे स्वागत होते. बाह्यरुग्ण विभाग, अपघात विभाग ते मेडिसीन विभागापर्यंत संपूर्ण रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात सापडला. वाहनचालकांबरोबर रुग्णांसाठी खड्डे अडथळे ठरत असल्याने रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीची मागणी होत होती.
सार्वजनिक बांधकाम विभागाने शनिवारी रस्त्यावरील खड्डे खडी टाकून बुजविण्याचे काम हाती घेतले. हे काम दोन दिवस चालणार आहे. ‘पॅचवर्क ’मुळे खड्ड्याच्या त्रासातून वाहनचालक, रुग्णांची सुटका होईल; परंतु हे पॅचवर्क किती दिवस टिकेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पॅचवर्कऐवजी संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे. सध्या केवळ खड्डे बुजविण्यात येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, के. एम. आय. सय्यद यांनी सांगितले.
प्रस्ताव रेंगाळलाघाटीच्या अंतर्गत रस्त्यांचा प्रस्ताव घाटीने देऊन अनेक महिने उलटले आहेत. त्याला मंजुरी मिळावी, यासाठी घाटी प्रशासनाकडून प्रयत्न सुरूआहेत. घाटी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापासून मेडिसीन विभागापर्यंतचा हा मुख्य रस्ता सिमेंटचा करण्याचा प्रयत्न आहे.