औरंगाबाद : मुंबई- नागपूर या ८५० किलोमीटर अंतराच्या ‘सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे’ च्या भूसंपादनासाठी आंध्र प्रदेशची प्रस्तावित राजधानी अमरावतीसाठी वापरलेला पॅटर्न लागू करण्याचा विचार असून, या महामार्गावर २३ टाऊनशिप उभ्या राहणार आहेत. मराठवाडा समृद्धीचा हा महामार्ग औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतून १५५ किलोमीटर जाणार असून, त्या मार्गावर ४ टाऊनशिप उभारल्या जाणार आहेत. महामार्ग आणि टाऊनशिप मिळून साडेचार हजार हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. विभागीय आयुक्तालयात सोमवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत रस्ते विकास महामंडळाने त्या महामार्गाचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन भूसंपादनाशी संबंधित यंत्रणांसमोर सादर केले. ६ पैकी ४ टाऊनशिप उभारण्यात येणार असून, जालन्यात सर्वात मोठी १ हजार हेक्टरवरील टाऊनशिप उभारण्यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दांगट यांनी दिली. ते म्हणाले, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यांतून १५५ कि़ मी. रोड जात आहे. त्यामध्ये ४ ठिकाणी टाऊनशिप विकसित करण्याचे ठरले आहे. जालना, करमाड-शेकटा, लासूर स्टेशन, माळीवाडा-दौलताबाद येथे टाऊनशिप उभारण्यात येईल. जालन्यात १ हजार हेक्टरमधून टाऊनशिप उभारण्यात येईल. साडेचार हजार हेक्टर जागा रोड आणि टाऊनशिपसाठी लागेल. भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना काय मावेजा द्यायचा, त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर चर्चा करून होणार आहे. शेतकऱ्यांना जास्तीचा फायदा होईल, असाच तो निर्णय होईल. बैठकीला राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, विभागीय आयुक्त डॉ. दांगट, महामंडळाचे सहसंचालक कुरुंदकर, जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडे, जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, रस्ते विकास महामंडळाचे मुंबई व स्थानिक मुख्य अभियंते, नगररचना, भूमी अभिलेख व इतर अधिकारी, अशा ५० जणांची उपस्थिती होती. ग्रामजीवन उंचावणार ग्रामीण भागाच्या जवळून हा रस्ता जाणार आहे. तेथे सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध (पान २ वर) ४नागपूर-सेलडोह-वर्धा-येळी-पुलगाव-धामणगाव-वखफळी-कारंजा लाड-सेलू बाजार-मालेगाव-मेहकर-दुसरबीड-सिंदखेडराजा-जालना-शेंद्रा-औरंगाबाद-सावंगी-दौलताबाद-लासूर-वैजापूर-शिर्डी-गोंदे-पिंपळगाव मोर-घोटी, देवळी-खर्डी-शहापूरजवळील कासेगाव-वडपे (भिवंडी बायपास) असा हा सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे असेल. पुढे ते कापूरबावडी जंक्शनवरून मुंबई असा जाईल. २२ जिल्ह्यांना जोडणार हा महत्त्वाकांक्षी मार्ग प्रत्यक्ष ११ जिल्ह्यांमधून जाणार असला तरी चारपदरी जोडरस्त्यांनी तो अन्य ११ जिल्ह्यांना जोडला जाणार आहे. विदर्भ-मराठवाडा, उत्तर व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा हा महामार्ग असेल. नागपूर ते औरंगाबाद हे अंतर तीन तासांत तर त्यापुढील मुंबईपर्यंतचे अंतर तीन तासांत कापता येईल.