दोन मुलांत प्रखरतेने फरक जाणवला
माझा मोठा मुलगा एका खासगी शाळेत शिक्षण घेतो. मुलगी पाठशाला प्री प्रायमरी स्कूलमध्ये सिनियर के.जी.ला शिक्षण घेते. येथील नावीन्यपूर्ण शिक्षण पद्धतीमुळे मुलापेक्षा मुलीची वेगाने प्रगती दिसून आली. दोन मुलांत हा फरक मला प्रखरतेने जाणवला.
- डॉ. स्वप्नील पाटणुरकर
पालक
----
न अडखळता वाचन करते
माझी मुलगी नर्सरीपासून पाठशाला प्री प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षण घेते. यंदा सिनिअर के.जी.मध्ये आहे. न अडखळता ती वाचन करते. अन्य शाळेतील तिच्या मैत्रिणींपेक्षा तिच्यामधील शिक्षणाची गोडी अधिक व नवनवीन शिक्षणाची ओढ जास्त दिसून आली.
- किरण वाघमारे
पालक
----
वैयक्तिक लक्ष
माझी मुलगी यंदा सिनिअर के.जी.ला शिकत आहे. ज्युनिअर के.जी.चे ऑनलाईन शिक्षण घेतले. पाठशाला स्कूलमधील हसत खेळत शिक्षण यामुळे अभ्यासाविषयी मुलीमध्ये गोडी निर्माण झाली. तिला अभ्यासाचे दडपण जाणवत नाही. आकलन शक्ती वाढली आहे. कमी विद्यार्थी संख्या असल्याने शिक्षकांना वैयक्तिक लक्ष देता येते. यामुळे मुलांमधील गुण-दोष आमच्या लक्षात येतात व दोष दूर करण्याचा लगेच प्रयत्न केला जातो.
- दीपिका राजपूत
पालक