शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

संयम सुटला आणि त्याने विभागीय आयुक्तांच्या दालनातच ओतून घेतले स्वतःवर रॉकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 12:32 PM

Suicide attempt at Divisional Commissioner's office Aurangabad बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास तो आयुक्तालयात आला. त्याने अभ्यागत भेटीसाठी आयुक्तांना शिपायाच्या हस्ते चिठ्ठी दिली.

ठळक मुद्देसार्वजनिक शौचालय घोटाळ्याची चौकशीची मागणीसर्व सुरक्षा भेदून तो रॉकेल घेऊन दालनात शिरला

औरंगाबाद : सार्वजनिक शौचालयात झालेल्या घोटाळ्याची चौकशी काही वर्षांपासून पुढे सरकेना. जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन आणि विभागीय आयुक्तालयापर्यंत न्याय मागण्यासाठी आलेल्या दिलीप राजगुरू (रा. रुई, ता. अंबड, जि. जालना) याचा संयम बुधवारी सुटला. न्याय मिळण्यात होणाऱ्या विलंबाच्या नैराश्यातून त्याने सर्व सुरक्षा यंत्रणा भेदून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या दालनात सोबत आणलेले कॅनभर रॉकेल अंगावर ओतून घेतले. दुपारी २.४० वाजता घडलेल्या या प्रकारामुळे एकच गदारोळ उडाला. उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी यांच्या अंगावरही रॉकेल पडले. राजगुरू यास सिटीचौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, आयुक्तालय प्रशासनाने पोलिसांना एक पत्रही दिले. 

दुपारी २ वाजेच्या सुमारास तो आयुक्तालयात आला. त्याने अभ्यागत भेटीसाठी आयुक्तांना शिपायाच्या हस्ते चिठ्ठी दिली. आयुक्तांनी त्याला उपायुक्तांकडे पाठविण्यास सांगितले. शिपायाने दिलीपला उपायुक्तांना भेटा म्हणून निरोप दिला. निरोप मिळताच दिलीपने शिपाई, सुरक्षारक्षकाची नजर चुकवून आयुक्तांच्या दालनात प्रवेश घेत आरडा-ओरडा करीत अंगावर रॉकेल ओतून घेतले. आयुक्तांच्या दालनात गदारोळाचा आवाज येताच, सर्वांनी धाव घेत दिलीपला पकडल्याने अनर्थ टळला. कर्मचाऱ्यांनी त्याला खुर्चीवर बसविले. तातडीने सिटीचौक पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी दिलीपला ताब्यात घेतले. ही सगळी घटना अचानक घडली. मागील चार वर्षांतील सार्वजनिक शौचालय आणि ग्रामपंचायतींतर्गत घोटाळ्याच्या चौकशीची त्याची मागणी होती. त्यानुसार प्रशासनाने प्रकरण संदर्भित केल्याचे उपायुक्त वीणा सुपेकर यांनी सांगितले.

कशासाठी आला होता तो आयुक्तालयातजालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रुई येथील सार्वजनिक शौचालय बांधणीत घोटाळा झाल्याची तक्रार घेऊन दिलीप यापूवीर्ही आयुक्तालयात आला होता. मयत व्यक्तीच्या नावावर शौचालय बांधून अपहार केल्याची त्याची तक्रार होती. आयुक्तांनी सदरील प्रकरण जालना जिल्हा परिषदेकडे वर्ग केले. जि.प. पथकाने तक्रारीच्या अनुषंगाने पाहणी केली. त्याबाबत निष्कर्ष काढणे बाकी आहे.

रॉकेल त्याच्याकडे आले कुठून?मराठवाड्यात उस्मानाबाद आणि औरंगाबादमधील काही तालुके वगळता कोणत्याही जिल्ह्यात रॉकेल येत नाही. रॉकेल वितरण बंद असल्यामुळे कोरोनाने दगावलेल्या मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी डिझेल वापरावे लागते आहे. अशी सगळी परिस्थिती असताना कॅनभर रॉकेल दिलीपने कुठून आणले? याबाबतही विभागीय प्रशासन गांभीर्याने विचार करीत आहे. यानिमित्ताने आयुक्तालय सुरक्षेचा मुद्दाही समोर आला आहे.

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयAurangabadऔरंगाबादCorruptionभ्रष्टाचार