श्यामकुमार पुरे
सिल्लोड : पावसाने मध्यंतरी दडी मारल्याने तालुक्यातील ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. खते-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत, यासाठी पीककर्ज मिळावे म्हणून शेतकरी बँकांच्या खेट्या मारत आहेत. मात्र, राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना केवळ तारीख पे तारीख देत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
औरंगाबाद जिल्हा बँकांनी खरीप पीककर्ज वाटप मोहिमेंतर्गत १५ शाखांतून १८ हजार ३८७ शेतकऱ्यांना ५६ कोटी १६ लाख रुपये पीककर्ज वाटप केले आहे.
त्या तुलनेत राष्ट्रीयीकृत बँकांच्या विविध १३ शाखांनी मिळून केवळ ४ हजार १७१ शेतकऱ्यांना केवळ १७ कोटी ५३ लाख रुपये वाटप केले. असे एकूण २२ हजार ५५८ शेतकऱ्यांना ६३ कोटी ६९ लाख रुपये खरीप पीककर्ज वाटप केले आहे.
तालुक्यात एकूण ६० हजार शेतकरी आहेत, मात्र अजूनही ३८ हजार शेतकरी पीककर्जापासून वंचित आहेत. वेळ निघून गेल्यावर मिळणारे कर्ज काहीच कामाचे नाही. यामुळे पात्र शेतकऱ्यांना तत्काळ पीककर्ज वाटप करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
कोट...
बैठक बोलावतो..
राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना तत्काळ पीककर्ज देण्याबाबत सूचना दिल्या जातील.
-डी. आर. मातेरे, सहायक निबंधक, सिल्लोड.
चौकट...
या राष्ट्रीयीकृत बँकांनी वाटप केले १७ कोटी ५३ लाख
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सिल्लोड - १ कोटी ३५ लाख, अजिंठा - १ कोटी ४२ लाख, डोंगरगाव शाखा -२० लाख, महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सिल्लोड- १ कोटी २२ लाख, घाटनांद्रा- १ कोटी १६ लाख, अंभई- ५० लाख, पानवडोद- ४ कोटी ५५ लाख.
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सिल्लोड- १ कोटी २२ लाख, बँक ऑफ बडोदा शाखा भवन- १ कोटी ५६ लाख, उंडणगाव- २ कोटी ५६ लाख, युनियन बँक भराडी- ९३ लाख
कॅनरा बँक सिल्लोड- ५ लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सिल्लोड- ४२ लाख, एचडीएफसी बँक शाखा सिल्लोड- ९० लाख, असे एकूण ४१७१ शेतकऱ्यांना १७ कोटी ५३ लाख रुपये खरीप पीककर्ज वाटप केले.
चौकट...
जिल्हा मध्यवर्ती बँकेने वाटप केले ५६ कोटी १६ लाख
भराडी- ६ कोटी ३६ लाख, सिल्लोड- ५ कोटी ९७ लाख, शिवना- १ कोटी १० लाख, घाटनांद्रा- ४ कोटी २३ लाख, अजिंठा- १ कोटी ३७ लाख, हट्टी- ७० लाख, पालोद- २ कोटी १६ लाख, भवन- ८ कोटी ४१ लाख, अंभई- ५ कोटी ३१ लाख, उंडणगाव- २ कोटी ७१ लाख, आमठाणा- ४ कोटी ६ लाख, अंधारी- ६ कोटी ७७ लाख, बोरगाव बाजार- ३ कोटी ३७ लाख, रहिमाबाद २ कोटी १४ लाख, पानवडोद- १ कोटी ४४ लाख, असे एकूण १८,३८७ शेतकऱ्यांना ५६ कोटी १६ लाख रुपये वाटप केले आहे.
कोट
शेतकऱ्यांना तत्काळ पीककर्ज देणार
मागील १५ दिवसांत मी अनेक पीककर्ज निकाली काढले. शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन त्यांना तत्काळ पीककर्ज दिले जाईल.
-एस. बी. झोडगे, मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अजिंठा.