छत्रपती संभाजीनगर : महावितरणने मार्च जवळ आल्याने थकबाकी वसुली जोरात सुरू केली आहे. कनेक्शनदेखील कापण्याचा सपाटा सुरू आहे. गैरसोय व अंधारात राहण्याचा त्रास टाळण्यासाठी थकबाकी भरा, असे आवाहन महावितरण सातत्याने करीत आहे.
परिमंडलात २१८ कोटींची थकबाकीछत्रपती संभाजीनगर परिमंडलातील ४ लाख ३० हजार ५३९ घरगुती, व्यावसायिक औद्योगिक व इतर ग्राहकांकडे २१८ कोटी २६ लाख रुपये थकबाकी साचली आहे. त्यामुळे महावितरणला वसुलीशिवाय पर्याय नाही.
कोणत्या तालुक्यात किती थकबाकी?तालुका घरगुती कृषी औद्योगिक जोडणी - थकबाकी लाखात-छत्रपती संभाजीनगर शहर विभाग १ - ६७,१६४ - ४१२९.५६-छत्रपती संभाजीनगर शहर विभाग २- ५४,९२९ - १६२९.५८-ग्रामीण विभाग १ - ५५,८६३ -२०९४.०४ -ग्रामीण विभाग २- ४६,९२९ -१६९२.७३-कन्नड विभाग - ४२,१२९ -११७८.२५-सिल्लोड विभाग - ३२,८६६ -८४६.१
-छत्रपती संभाजीनगर झोन -४,३०,५३९ -२१,८२६.७७
वीजग्राहकांना केव्हाही व कुठूनही ऑनलाइनद्वारे थकीत व चालू वीजबिल www. mahadiscom.in या संकेतस्थळावर अथवा महावितरणच्या मोबाइल ॲपवर भरता येते. पाच हजारांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
कनेक्शन तोडण्याचा सपाटाआर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून थकीत रक्कम किती आहे, हे न पाहता वीजपुरवठा खंडित केला जात आहे. हजारोंची थकबाकीदारांची वीज तोडण्यात आली. महावितरणकडून अशा ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी काही मुदत वाढवून दिली जात होती. ही टप्पा पद्धतही आता बंद केली आहे. त्यामुळे ग्राहकांना वेळेत वीजबिल भरण्यापलीकडे दुसरा कोणताही पर्याय नाही.
..तर संबंधितांवर विद्युत कायद्यांतर्गत कारवाईज्या थकबाकीदारांची वीज खंडित करण्यात आली आहे, अशा थकबाकीदारांच्या वीजजोडण्यांची स्वतंत्र पथकाद्वारे तपासणी केली जात आहे. थकबाकीदार शेजाऱ्याकडून अथवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारावर विद्युत कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जात आहे.- महावितरण अधिकारी