छत्रपती संभाजीनगर : वीज बिलांचा भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी ‘महावितरण’ने सातत्याने नवनवीन सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. महावितरणने स्वतःचे पेमेंट वॉलेट सुरू केले असून आवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या पतसंस्था तसेच किराणा, मेडिकल व जनरल स्टोअर्स चालकांना वॉलेटधारक होता येईल. त्यातून वीज ग्राहकांना विशेषतः ग्रामीण भागात वीज बिलांचा भरणा करणे सुलभ होण्यासह प्रति बिल पावतीमागे ५ रुपये उत्पन्न मिळविण्याची संधी वॉलेटधारकास मिळणार आहे.
काय आहे महापॉवर पे वॉलेट?एकाच वॉलेटचा बॅलन्स वापरून विविध लॉगीनद्वारे वेगवेगळ्या व्यक्तींकडून वीज बिलांचा भरणा करून घेण्याची सुविधा वॉलेटमध्ये देण्यात आली असून याचा लेखाजोखा व कमिशन महिनाअखेर मुख्य वॉलेटमध्ये जमा केले जाईल.
प्रती ग्राहक पाच रुपयांचे मानधनऑनलाईनचा काळ आल्याने वेळ वाया जाऊ नये यासाठी व जे हे ॲप वापरणार त्यांना प्रति ग्राहकामागे वॉलेटधारकास प्रती बिलामागे ५ रुपये कमिशन मिळणार असून महिना अखेरीस ते वॉलेटमध्ये जमा करण्यात येईल.
जिल्ह्यात १५७ पे वॉलेट धारकछत्रपती संभाजीनगर परिमंडळात १५७ वॉलेटधारक आहेत. त्यासाठी पे वॉलेटधारक होण्यासाठी तुम्हाला तुमच्या कामातही फायद्याची यंत्रणा फक्त वापर करायची असून, त्याचे मानधनही उत्पन्नात भर टाकणारेच आहे.
पे वॉलेटधारक होण्यासाठी करा अर्जवॉलेटधारक होण्यास इच्छुक असणाऱ्या पतसंस्थांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, जीएसटी क्रमांक, गुमास्ता प्रमाणपत्र (शॉप ॲक्ट),पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट फोटो व रद्द केलेला धनादेश आदी आवश्यक कागदपत्रांच्या प्रती महावितरणच्या विभागीय कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. अर्जदारांच्या अर्जाची व जागेची पडताळणी संबंधित उपविभागीय कार्यालयाकडून विनाशुल्क केली जाईल तर मुंबईस्थित मुख्य कार्यालयाकडून अर्जांना मंजुरी मिळणार आहे.
ग्राहकांना अन् महावितरणलाही फायदाबिलामागे महिना अखेरीस ते वॉलेटमध्ये जमा करण्यात येईल. शहर व ग्रामीण भागातील अधिकाधिक पतसंस्था, दुकानदार यांनी वॉलेटधारक होण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.- महावितरण अधिकारी