शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

३१ मार्चपर्यंत मालमत्ता कर भरा; अन्यथा नंतर २४ टक्के व्याज

By मुजीब देवणीकर | Published: March 27, 2024 6:56 PM

व्याजमाफीची योजना दोन वर्षांपासून बंद, चक्रवाढव्याज पद्धत

छत्रपती संभाजीनगर : मालमत्ता कर व पाणीपट्टीची रक्कम भरण्यासाठी दि. ३१ मार्चपर्यंत मुदत आहे. दि. १ एप्रिलपासून थकबाकीवर २४ टक्के चक्रवाढ पद्धतीने व्याजाची आकारणी मनपाकडून केली जाते. यापूर्वी व्याजावर ७५ टक्के सूट दिली जात होती. मागील दोन वर्षांपासून ही योजना सुद्धा बंद करण्यात आल्याने मालमत्ता कराचा बोजा नागरिकांवर वाढतच चालला आहे.

मालमत्ता करातून १३२ कोटी ४६ लाख, तर पाणीपट्टीच्या माध्यमाने २२ कोटी ४७ लाख रुपये, असे एकूण १५४ कोटी ९३ लाख रुपये वसूल झाले. गतवर्षीच्या तुलनेत वसुली वाढली आहे. शिवाय मालमत्ताधारक स्वत:हून कर लावून घेण्यासाठी पुढे येताहेत. १ एप्रिलनंतर नवीन मालमत्तांना दुप्पट वाढीव दराने कर लावण्यात येईल. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत कर भरला तर उलट सामान्य करात सूट मिळते. ऑनलाइन पद्धतीने कर भरला तरी सूट मिळते. जुुलै महिन्यापासून दरमहा व्याज आकारणी सुरू होते. वर्षाअखेर हा आकडा २४ टक्के होतो.

झोननिहाय वसुलीचा आलेखझोन --------- मालमत्ता कर-------- पाणीपट्टी---------------- एकूण (कोटी)एक --------- १२.४९---- ---------- १.४६--------------- १३.९५दोन ---------- ११.९३-------------- १.६८-------------- १३.६१तीन---------- ०४.८६-------------- १.१९--------------- ०६.०५चार----------- १२.४१------------ ३.७०----------------- १६.११पाच----------- १८.५६------------ ३.१४------------------ २१.७०सहा----------- ०९.७८------------ २.३३------------------ १२.११सात----------- २१.७८------------ ३.९३------------------ २५.७१आठ---------- २४.७२------------- ०.७४------------------- २४.९६नऊ---------- १६.३८-------------- ४.३०------------------- २०.६८दहा --------- ००.०५-------------- ००.०० ------------------ ००.०५एकूण---------१३२.४६----------- २२.४७ ----------------- १५४.९३

१५४ कोटी वसूलमालमत्ता कर, पाणीपट्टीच्या माध्यमातून १५४ कोटी रुपयांची वसुली झाली. ३५० कोटींचे उद्दिष्ट मनपाने डोळ्यासमोर ठेवले होते. त्या तुलनेत ५० टक्के वसुली झाली. ३१ मार्चपर्यंत हा आकडा आणखी बराच वाढण्याची शक्यता आहे.

कोणावर कारवाई?मोठी थकबाकी असेल तर जप्तीदहा लाखांपेक्षा जास्त रक्कम थकीत असलेल्या मालमत्ताधारकांना नियमानुसार तीन नोटिसा देण्याची प्रक्रिया मनपाने सुरू केली. नंतर मालमत्ता जप्त केली जाईल. तिचा लिलाव करून मनपा आपली मूळ रक्कम काढून घेईल.

मोठी पाणीपट्टी थकीत असेल तरी कारवाईज्या नागरिकांकडे, व्यावसायिकांकडे बरीच पाणीपट्टी थकीत असेल तर त्यांचेही नळ कापण्याची कारवाई महापालिका करणार आहे. ३१ मार्चपूर्वी पैसे भरण्याची संधी आहे.

वेळेत कर भरणा करावा३१ मार्चपूर्वी थकबाकी, चालू आर्थिक वर्षाचा कर मालमत्ताधारकांनी भरावा. व्याजही टाळता येईल. जप्तीची कारवाईही टळेल.- अपर्णा थेटे, उपायुक्त, मनपा

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका