जिल्हा मुद्रांक अधिकारी दीपक सोनवणे यांच्यासह सर्व विभाग अधिकाऱ्यांची व दस्तलेखक, स्टॅम्प विक्रेत्यांची त्यांनी मंगळवारी बैठक घेतली.
सुटीच्या दिवशी दस्तनोंदणी सुरू राहणार असून दि.१९ डिसेंबर या एकाच दिवशी २२३ खरेदी- विक्रीचे व्यवहार झाले. त्यातून सुमारे ९० लाख रुपयांचा महसूल जमा झाला.
३ टक्के सवलत ३१ डिसेंबरपर्यंत असल्यामुळे नोंदणी कार्यालयात प्रचंड गर्दी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये. यासाठी एप्रिलपर्यंत सवलतीचा निर्णय घेण्यात आला आहे. असे वायाळ यांनी कळविले आहे. दि. ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन मुद्रांक शुल्क नोंदणीसाठी चालान भरून ठेवले तरी पुढील चार महिन्यांत रजिस्ट्री करता येईल. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये. एप्रिल २०२१ पर्यंत ही सवलत देण्यात आली आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, मुद्रांक कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन वायाळ यांनी केले आहे.