शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचा आमदार ठरणार
3
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
4
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
6
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
7
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
8
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
9
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
10
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
11
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
12
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
14
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
15
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
16
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
17
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
19
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
20
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!

वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी कॅन्सरग्रस्ताकडून लाच घेताना वेतन अधीक्षक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 7:55 PM

एसीबीची कारवाई : शिक्षकाकडून कार्यालयातच ५० हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले

छत्रपती संभाजीनगर : कॅन्सर झालेल्या शिक्षकाच्या पत्नीसह वडिलांच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या बिलातील तब्बल २० टक्के रक्कम लाच म्हणून घेताना जि. प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वेतन अधीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने कार्यालयातच बुधवारी रंगेहाथ पकडले. दिलीप परशराम जऊळकर (५०) असे लाच घेणाऱ्या वर्ग दोनच्या वेतन अधीक्षकाचे नाव असल्याची माहिती उपअधीक्षक मारुती पंडित यांनी दिली.

जि.प.च्या एका प्राथमिक शिक्षकाच्या पत्नीला कॅन्सर झालेला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या उपचाराची ११, शिक्षकाच्या वडिलांच्या उपचाराची ३ मेडिकल बिले प्रतिपूर्तीसाठी शिक्षण विभागाकडे सादर केली होती. १४ बिलांची एकूण रक्कम ६ लाख ६३ हजार रुपये एवढी होती. मंजुरीसाठी शिक्षकाने कार्यालयाचे उंबरठे झिजवले. मात्र प्रतिसाद मिळला नाही. प्रत्येक टप्प्यावर पैशाची मागणी झाली. शेवटी ही बिले वेतन अधीक्षक जऊळकर यांच्या कार्यालयात पोहोचली. तेव्हा त्याने एकूण बिलाच्या रकमेच्या २० टक्के पैसे दिल्याशिवाय बिल ट्रेझरीत मंजुरीसाठी पाठवणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे शिक्षकाने २० टक्क्यांनुसार सुरुवातीला ५० हजार रुपये देण्याचे मान्य केले. मात्र, पैसे देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी ६ मार्चला एसीबीकडे तक्रार नोंदवली. एसीबीचे पोलिस निरीक्षक संदीप राजपूत यांच्या पथकाने वेतन अधीक्षकाच्या कार्यालय परिसरात सापळा लावला. शिक्षकाकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जऊळकर यास रंगेहाथ पकडले. ही कारवाई अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक संदीप राजपूत, अंमलदार केवलसिंग गुसिंगे, रवींद्र काळे, चांगदेव बागूल यांच्या पथकाने केली. या प्रकरणी वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

वैद्यकीय बिलांसाठी होतो त्रासप्रा. शि. विभागाच्या अंतर्गत वैद्यकीय बिलांसाठी शिक्षकांना त्रास सहन करावा लागतो. पैसे मिळाल्याशिवाय बिल मंजूरच होत नाही. वैद्यकीय उपचारानंतर मुख्याध्यापकाचे कव्हरिंग लेटर लावून घाटी हॉस्पिटल किंवा जिल्हा शल्यचिकित्सकांकडे बिल सादर केले जाते. तेथे तपासणीनंतर शिक्षणाधिकाऱ्यांकडे जाते. त्यांच्याकडून वेतन अधीक्षकाकडे जाते. तेथे मंजूर करून ट्रेझरीत पाठवतात. ट्रेझरीतून वैद्यकीय बिलाचे पैसे संंबंधित शाळेच्या बँक खात्यात जमा होतात. मुख्याध्यापक संबंधित शिक्षकाच्या बँक खात्यात वैद्यकीय बिलाचे पैसे पाठवितात, अशी ही किचकट प्रक्रिया आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग