शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

औरंगाबाद जिल्ह्यात बंद शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 12:26 AM

भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ बुधवारी राज्यभरातील दलित संघटना व भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्टÑ बंदची हाक दिली होती. या बंदला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ बुधवारी राज्यभरातील दलित संघटना व भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्टÑ बंदची हाक दिली होती. या बंदला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. किरकोळ प्रकार वगळता जिल्ह्यात शांततेत बंद पाळण्यात आला. यावेळी समाजबांधवांनी आपल्या भावना व्यक्त करून मागण्यांचे निवेदन तहसीलदार व पोलीस अधिकाºयांना दिले. पैठणमध्ये मंगळवारी बंद पाळण्यात आल्याने बुधवारी सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता.फुलंब्री शहरात शुकशुकाटफुलंब्री : फुलंब्री शहरात शंभर टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला. निषेधसभा घेऊन तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन दिले.बंदला व्यापारी, दुकानदार, छोटे हॉटेलचालक, भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी प्रतिसाद दिला. दुपारी दोन वाजेपर्यंत बसस्थानक, खुलताबाद रोड, टी पॉइंट, औरंगाबाद रोड या मार्गावर शुकशुकाट होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दलित समाज बांधवांनी एकजूट करुन घटनेचा निषेध करत सामंजस्याची भूमिका घेतली व पोलीस प्रशासनाला सहकार्य केले.आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार उद्धव नाईक, प्रशांत काळे, पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांना देण्यात आले. यावेळी जनार्दन शेजवळ, राजू प्रधान,अमित वाहूळ, रोशन अवसरमल, अ‍ॅड. संगीता हिवराळे, दिलीप गंगावणे, संजय इंगळे, संजय मोरे, संजय प्रधान, बाबासाहेब गंगावणे, पप्पू जाधव, रागा भुईगळ, सुखदेव नरवडे, बाळकृष्ण साळवे, संजय हिवराळे, बाळू गंगावणे, मनोहर प्रधान, सुनील सरोदे, देवेंद्र गंगावणे, विशाल गंगावणे, सुरेश गंगावणे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.बुधवारी पुकारलेल्या बंदमध्ये एसटी महामंडळाच्या बसेस दुपारी दोन वाजेपर्यंत बंद होत्या तर खाजगी वाहने काही प्रमाणात सुरु असल्याचे दिसून आले. फुलंब्री तालुक्यातील सरकारी, निमसरकारी कार्यालये सुरु होती. यात काम करणारे कर्मचारी औरंगाबाद येथून मिळेल त्या वाहनाने येताना दिसले. शहरातील सरकारी, खाजगी शाळेत शिक्षक वेळेवर आले पण विद्यार्थी आले नाही. पालकांनी त्यांना शाळेत पाठविले नाही. आज दिवसभर विद्यार्थी विनाशाळा सुरु होत्या.पैठणचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांची उचलबांगडी४पैठण : पैठणच्या बाजारपेठेत सर्वत्र व्यवहार सुरळीत सुरू होते. दरम्यान, शहरात मंगळवारी बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेनंतर पैठण ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.४भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी पैठण शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. या बंदमुळे बुधवारी बंदला प्रतिसाद मिळाला नाही. मंगळवारी पैठण शहरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेत कायदा व सुव्यवस्था राखण्यात स्थानिक पोलीस प्रशासन कमी पडले अशा अनेक तक्रारी नागरिकांनी पोलीस अधीक्षकांकडे केल्या होत्या.४यानंतर त्यांनी बुधवारी पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांची औरंगाबाद ग्रामीण कंट्रोल रूम येथे उचलबांगडी केली. त्यांच्या जागी गंगापूरचे पोनि. सी. बी. इमले यांची नियुक्ती करण्यात आली. गंगापूर येथे पोलीस निरीक्षक एस.एस. बिर्ला यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, आज शहरभर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे शांतता होती.सिल्लोड : भीमा -कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ सिल्लोड येथील बहुजन समाज पार्टी, भाकप, बीआरएसपी, संभाजी ब्रिगेड, भारिप-बहुजन महासंघ, एमआयएमच्या वतीने सिल्लोड बंदच्या आव्हानाला व्यापाºयांनी प्रतिसाद देत दुसºया दिवशीही बुधवारी आपली दुकाने बंद ठेवली. बंदमुळे बाजारपेठेत शुकशुकाट होता. तसेच बससेवा बंद असल्याने बसस्थानकातदेखील शुकशुकाट होता. सिल्लोड शहरात मोर्चा काढून घटनेचा निषेध करण्यात आला.मोर्चा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर नायब तहसीलदार संजय सोनवणे यांना निवेदन दिले. यावेळी बीआरएसपीचे प्रा. सुनील वाकेकर, कडूबा जगताप, अष्टपाल सिरसाठ, भाकपचे कॉ. सय्यद अनीस, कॉ. शेख अमान, कॉ. गोविंदा कापरे, कॉ. अशोक गायकवाड, बहुजन समाज पाटीर्चे शेख अकरम, संभाजी ब्रिगेडचे काकासाहेब मोरे, नारायण फाळके, भारिप बहुजन महासंघाचे देवीदास दांडगे, एमआयएमचे तालुकाध्यक्ष बनेखा पठाण, शहराध्यक्ष शेख इम्रान, साहेबखा पठाण, अन्वर पठाण आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. सिल्लोड शहराससह ग्रामीण भागातही १०० टक्के बंद पाळण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार, पोलीस निरीक्षक भागीरथ देशमुख, सपोनि. विश्वास पाटील, किरण आहेर, शेख शकील आदींनी चोख बंदोबस्त ठेवला.वैजापूर : शहरासह खंडाळा, शिऊर, लोणी खुर्द, रोटेगाव, शिवराई, महालगावात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदच्या दरम्यान काही ठिकाणी किरकोळ टायर जाळण्याचे व रास्ता रोकोचे प्रकार वगळता बंद शांततेत पार पाडण्यात आला. तर वैजापूर बसस्थकातून बुधवारी एकही बस स्थानकाबाहेर निघाली नाही. त्यामुळे प्रवाशांचे दिवसभर हाल झाले. भीमशक्तीच्या वतीने सकाळी रोटेगाव येथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक अनिरुध्द नांदेडकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राजू बोधक, निजाम मामू, मोज्जम शेख, अतीक शेख बोरसरकर, विशाल शिंदे, यशवंत पडवळ, संतोष त्रिभुवन, गणेश बागूल, रमेश पगारे, सागर त्रिभुवन, वैभव बोधक, सचिन गायकवाड, सरिता रणकांबळे, लता केवंडे, आशा शिंदे, कल्पना बोधक आदी उपस्थित होते. एमआयएमचे शेख वसीम, गुड्डू चौधरी, बबलू पठाण,अब्बू शेख यांनीही रास्ता रोको आंदोलनास पाठींबा दिला.शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ भारिप बहुजन महासंघाच्या वतीने तालुका अध्यक्ष बाबासाहेब वाघ यांनी पोलीस उपअधीक्षक सुनील लांजेवार यांना निवेदन दिले. यावेळी संजय बागूल, रमेश बागूल, कुसुमताई बागूल, डॉ. व्ही. जी. शिंदे, यशवंत पडवळ, साहेबराव पडवळ, मंगेश गायकवाड, राजेंद्र बागूल, संतोष त्रिभुवन, बाळासाहेब त्रिभुवन, लहानू त्रिभुवन, जीवन पठारे, सागर भाटे, शैलेश नन्नवरे, सुनील त्रिभुवन, चंद्रसेन भोसले, बाळासाहेब गायकवाड, धर्मेंद्र त्रिभुवन, आबासाहेब जेजूरकर, अनिल आल्हाट, प्रल्हाद सातुरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.खुलताबाद : बंदला तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. वेरूळ गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले, तर खुलताबाद शहरासह इतर गावांत सुरळीत व्यवहार सुरू होते. खुलताबादचा आठवडी बाजारही भरल्याने लोकांची गैरसोय झाली नाही. सकाळपासूनच खुलताबादेत सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले होते.वेरूळ येथे पर्यटक व भाविकांचे हाल झाले.वेरूळ येथील व्यापाºयांनी बंदमध्ये सहभाग घेतला होता. गाव व मंदिर परिसर शंभर टक्के बंद होते. तर लेणी परिसरातील व्यवहार सुरळीत सुरू होता. लेणी परिसरातील हॉटेल, काही व्यावसायिकांनी दुपारनंतर आपली दुकाने उघडली होती. एकंदरीत तालुक्यात कुठलाच अनुचित प्रकार घडला नाही.कन्नड : कन्नड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावर फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले.भीमशक्तीचे तालुकाध्यक्ष समुद्र मोरे, बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष कडूबा पवार, बहुजन सोशीलीस्ट पार्टीचे विश्वजित बागूल, योगेश अंभोरे, शरद वाघ, सिद्धार्थ निकाळजे, जितेंद्र साठे, दयानंद बनकर, दिपक सिरसाठ, संदीप गायकवाड, बंटी काशीनंद, नानासाहेब थोरात, विष्णू म्हस्के, राजू खिल्लारे, भय्यासाहेब पैठणे, भय्यासाहेब जगताप आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. जमावाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन व्यवसायिकांनी दुकाने बंद ठेवली.आतापर्यंत कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरात बंद पाळला गेला नव्हता. सलग दुसºया दिवशीही आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. शाळांही बंद होत्या. दुपारनंतर हळूहळू दुकाने उघडली.गंगापूर : गंगापूर शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.भारिप बहुजन महासंघ, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र डावी आघाडी आदी संघटनांतर्फे शांततेच्या मार्गाने तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना निवेदन दिले.निवेदनावर जितेंद्र शिरसाठ, प्रवीण बर्फे, सागर दळवी, सचिन खाजेकर, योगेश शेळके, विश्वजीत चव्हाण, आनंद भिवसने, अण्णासाहेब खाजेकर, सचिन खाजेकर, विकास खाजेकर, विजय चंद्रात्रे, सुनील धाडगे, गोपाल भड, मकरंद दारुंटे, जयेश निरपळ, कडुबा खाजेकर,बापू खाजेकर,राहुल वानखेडे, बाबा भिवसने आदींसह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षºया आहेत.