लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागाच्या मुख्य वाणिज्य अधिकाºयांच्या एका पथकाने बुधवारी परभणी जिल्ह्यात अचानक रेल्वे गाड्यांची तपासणी करुन सुमारे दोनशे विनातिकिट प्रवाशांवर कारवाई केली आहे. मुख्य वाणिज्य निरीक्षकांचा दौरा गोपनीय ठेवण्यात आल्याने कारवाईसंदर्भात अधिक माहिती मिळू शकली नाही.रेल्वे विभागाच्या वतीने २० आॅक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात जनजागृती सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहात रेल्वेच्या वेगवेगळ्या सेवांची जनजागृती केली जात आहे.याच सप्ताहाचा भाग म्हणून सिकंदराबाद विभागाचे मुख्य वाणिज्य प्रबंधक बी़ शेखरन आणि वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक चंद्रबाबू यांनी बुधवारी अचानक परभणी जिल्ह्याचा दौरा केला. या दोन्ही अधिकाºयांचा दौरा अत्यंत गोपनीय ठेवला होता. त्यामुळे हे अधिकारी कुठे कारवाई करतात, याची माहिती मिळू शकली नाही.तालुक्यातील पिंगळी रेल्वेस्थानकावर पूर्णा- परळी आणि हैदराबाद पॅसेंजर या दोन रेल्वे गाड्या अधिकाºयांनी तपासल्या. यावेळी सुमारे २०० प्रवासी विनातिकिट प्रवास करीत असल्याने त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. या अधिकाºयांसमवेत रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी, स्थानिक रेल्वे पोलीस कर्मचारी, तिकिट तपासणीस असा ५० ते ६० जणांचा ताफा होता.
२०० रेल्वे प्रवाशांवर पथकाने केली दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 12:37 AM