शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
5
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
6
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
7
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
8
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
9
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
10
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
11
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
12
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
13
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
14
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
16
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
17
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
18
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
20
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान

नियम डावलून विंधन विहिरी घेण्याचा सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 5:31 PM

पाणीटंचाईत नको त्या ठिकाणी शेकडो छिद्र जमिनीला पाडण्याकडे जनतेचा भर

औरंगाबाद : पर्जन्यमान कमी असल्याने भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खालावली असून, सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या जलस्रोतापासून खाजगी विहीर किमान ५०० मीटरवर असावी. त्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाकडून पत्र घ्यावे लागते; परंतु नियम डावलून पाणीटंचाईत नको त्या ठिकाणी शेकडो छिद्र जमिनीला पाडण्याकडे जनतेचा भर असल्याचे दिसून येत आहे. 

सरकारी योजनेतील विहीर तसेच बोअरवेल खोदण्यासाठी नियम व अटी घालून दिल्या असून, त्यानुसारच जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागातील अभियंत्याच्या देखरेखीखाली कामे करून घेतली जातात; परंतु खाजगी विहीर व बोअरवेलधारक हे मनपा तसेच जिल्हा परिषद या दोन्ही यंत्रणांकडून कोणताही परवाना न घेता खाजगी जागेवर बोअर मारून पाणी उपसा करतात. 

भूगर्भातील पाणी पातळीत झपाट्याने घट झाली असली तरी जमिनीत विहीर व बोअरवेल पुनर्भरण करण्यावर भर देण्यात आला आहे; परंतु गत पाच वर्षांत पावसाचे प्रमाण अल्प असल्याने पाण्याची पातळी जमिनीत वाढण्याऐवजी दर वर्षाला दोन मीटरने खालावली आहे. ही सत्यता भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. त्यामुळे पाणी प्रश्नाची गंभीरता लक्षात येत आहे.  

परवानगी दोनशे फुटांची खोली साडेतीनशेपर्यंत कोरडीचशासकीय यंत्रणेकडून फक्त दोनशे फुटांपर्यंतच बोअरवेल घेता येतो; परंतु हट्टापायी भूगर्भात तीनशे ते साडेतीनशे फुटांपर्यंत बोअरवेल घेतला जात आहे. ग्रामीण व शहरातील सातारा, देवळाई, हर्सूल, पडेगाव, नक्षत्रवाडी, चिकलठाणा, चितेगाव एमआयडीसी परिसरातील लोकवसाहतीत पाणीटंचाई वाढली आहे. पाण्यासाठी बोअरवेलचा अनेकांचा खर्च व्यर्थ जात असून, टँकरच्या पाण्याकडे वळावे लागत आहे. शहराच्या लगतही नदीलगतच्या परिसरात पाणीपुरवठा बऱ्यापैकी मिळतो; परंतु जे बोअर उन्हाळ्यात कधी आटले नाहीत त्या बोअरने तळ गाठला आहे, याचा परिणाम भीषण पाणीटंचाई समोर आली आहे.

जनमताचा अहवाल पाठविलापाणी अडवा, पाणी जिरवा, बोअर, विहीर पुनर्भरण तसेच पाण्याचे व्यवस्थापन करून पाणीटंचाईवर मात करता येते. पाणी उपशाविषयीही नियम शासकीय दृष्टिपथात यावा म्हणून जनमत मागवून त्याचा अहवाल मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे उपसंचालक डॉ. पी. एल. साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठविला आहे, असे भूजल विभागाचे कनिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. शरद गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीAurangabadऔरंगाबाद