लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात चालु खरीप हंगामात ५७ हजार हजार ३४३ शेतकºयांना २८१ कोटी ७८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले असून देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण अवघे पंधरा टक्के इतकेच आहे. बहुतांश शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असल्याने त्यांनी या वेळी पीककर्ज घेण्याची तयारी दाखविली नाही.जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकºयांना पीककर्ज वाटप करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले होते. मागील वर्षी उद्दिष्टाच्या तुलनेत ८१ टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले होते. त्याआधीची तीन वर्ष दुष्काळजन्य स्थितीमुळे पीककर्ज घेणाºयांची संख्या वाढली होती. शेतीकामे तसेच बियाणे व खतांसाठी आर्थिक गरज असल्याने शेतकºयांनी पीककर्जासाठी बॅँकांकडे धाव घेतली होती.या वर्षी जिल्हयात १८ बॅँकांमार्फत पीकविमा वाटप करण्याचे नियोजन केले होते. चालू वर्षात १९२७ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतू या कालावधीत कर्जमाफी, पीकविमा आदी बाबींमुळे शेतकºयांनी पीक कर्ज घेण्यास आखडता हात घेतला. अनेक बॅँकांमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग, कामांचा वाढता ताण तसेच तांत्रिक अडचणींमुळे पीककर्ज वाटपास विलंब झाला.३१ जुलैअखेर जिल्ह्यात २७ हजार ८७९ शेतकºयांना पीककर्ज वाटप करण्यात आले. बहुतांश बॅँकांमध्ये प्रकरणे नवे जुने करण्यात आले आहेत. एकूण २८१ कोटी ७८ लाख रुपये पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. हे प्रमाण उद्दिष्टाच्या तुलनेत अवघे १४.६२ टक्के आहे.नवेजुने प्रकरण करण्यासाठी शासनाने एक महिन्याची मुदतवाढ दिली होती. परंतु फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. पीककर्जाचा मात्र टक्का घसरला आहे.
कर्जमाफीच्या प्रतीक्षेत घसरला पीककर्जाचा टक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:57 PM