शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
2
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
3
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
5
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
6
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
7
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
8
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
9
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
10
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
11
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
12
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
13
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
14
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
15
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
16
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
17
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
18
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
19
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
20
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

स्वरचैतन्यातून शाश्वत आनंदानुभूती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 1:26 AM

पाश्चात्त्य संगीत आणि भारतीय रागदारी संगीताचा अनोखा मिलाफ स्वरचैतन्यातून शाश्वत आनंदानुभूती देणारा ठरला. ‘अविस्मरणीय दिवाळी पहाट’ असाच उत्स्फूर्त उल्लेख करून दर्दी रसिकांनी या सांगीतिक सोहळ्याला दाद दिली. दिशा ग्रुप प्रस्तुत लोकमत स्वरचैतन्याची दिवाळी पहाटचे हे दुसरे वर्षे नावीन्यपूर्ण ठरले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दिवाळी पाडव्याची पहाट... पक्ष्यांचा किलबिलाट... लोकमतच्या हिरवळीवरील रंगमंचावर सरस्वती देवीच्या दर्शनाने शेकडो रसिकांची झालेली प्रसन्न मने... विश्वविख्यात ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. अजय पोहनकर यांनी छेडलेले ‘अलबेला साजन आयो रे’ सूर... नव्या युगाचा संगीतकार अभिजित पोहनकर यांनी शास्त्रीय संगीताचे की-बोर्डद्वारे केलेले फ्यूजन... तबला, बासरीच्या सुरावटीने निर्माण झालेले स्वगीतध्वनी... आणि अभिनेता मकरंद देशपांडे यांनी सादर केलेल्या शृंगाररसातील काव्याने प्रत्येक मनावर गारुड घातले... पाश्चात्त्य संगीत आणि भारतीय रागदारी संगीताचा अनोखा मिलाफ स्वरचैतन्यातून शाश्वत आनंदानुभूती देणारा ठरला. ‘अविस्मरणीय दिवाळी पहाट’ असाच उत्स्फूर्त उल्लेख करून दर्दी रसिकांनी या सांगीतिक सोहळ्याला दाददिली.दिशा ग्रुप प्रस्तुत लोकमत स्वरचैतन्याची दिवाळी पहाटचे हे दुसरे वर्षे नावीन्यपूर्ण ठरले. मैफलीबद्दल कमालीची उत्सुकता, उत्साह शहरातील दर्दी रसिकांमध्ये होता, तो २० रोजी पहाटे पाहण्यास मिळाला. ५.१५ वाजेपासूनच लोकमतच्या हिरवळीवर रसिकांच्या आगमनाला सुरुवात झाली होती.शहनाई चौघडाच्या सुरांनी पहाटेचे रम्य वातावरण मंगलमय बनविले होते. या मंगलवाद्याने प्रत्येकाचे स्वागत करण्यात येत होते. गेटमधून प्रवेश करताच समोर गणपतीची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. रंगमंचावर मुकुंद गोलटगावकर यांनी साकारलेली सरस्वती देवीची देखणी मूर्ती व पाठीमागील बाजूस मंदिर व शिल्पाकृतीच्या देखाव्याने उपस्थितांची मने प्रसन्न झाली... भारतीय शास्त्रीय की-बोर्ड वादक, फ्यूजन संगीताचे निर्माते आणि कंपोझर अशा अनेक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेले अभिजित पोहनकर यांनी शास्त्रीय राग की-बोर्डवर वाजविण्याची नवीन कल्पना प्रत्यक्षात आणली. त्यांचा ‘पिया बावरी’ हा भारतातील सगळ्यात लोकप्रिय फ्युजन संगीताच्या अल्बममधील काही रचना त्याने की-बोर्डवर छेडल्या आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्याच्या नवीन कल्पनेला जोरदार दाद दिली. की-बोर्ड, गिटार, बासरी व तबला वादनाच्या जुगलबंदीत सारेच हरखून गेले होते. फ्यूजन काय असते याची नव्याने प्रचीती तमाम कानसेनांना यावेळी आली. याच बहरलेल्या वातावरणात पं. अजय पोहनकर यांनी आपल्या मातोश्री किराणा घराण्याच्या गायिका डॉ.सुशीला पोहनकर यांची बंदिश ‘कोयलिया काहे करत पुकार’ हे बिलासखानी तोडीतील रागदारी सादर करून उपस्थिताना पाश्चात्य संगीत व भारतीय शास्त्रीय रागदारीची वेगळीच अनुभूती मिळवून दिली.यानंतर पंडितजींनी ‘याद प्रिया की आये, तू जहाँ जहाँ चलेगा, कोयलीया कुहु कुहु सुनाये’ या वेगवेगळ्या रागातील रचनांचे मिश्रण करून अनोखा प्रयोग सादर करून सर्वांची वाहवा मिळविली. जुन्या गाण्याला नवीन साज चढवीत स्थानिक कलाकार वैशाली कुर्तडीकर यांनी ‘केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली’ हे गीत गाऊन सर्वांची दाद मिळविली. ‘हे मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया’ ही गजलही पंडितजींनी तेवढ्याच ताकदीने सादर केली. ‘कैसे कटे दिन रेन सजन के’ ही ठुमरीही नवीन अंदाजमध्ये सादर करून या सांगीतिक सोहळ्याची सांगता झाली. गिटारवर सुशांत शर्मा, बासरी शशांक आचार्य व अमित मिश्रा यांनी तबल्याची सुरेख साथ देऊन फ्यूजन गाजविले. स्थानिक गायक सचिन नेवपूरकर यांनी साथ केली. कार्यक्रम संपल्यावर पं.अजय पोहनकर, अभिजित पोहनकर व अभिनेते मकरंद देशपांडे यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही. सूत्रसंचालन प्राजक्ता सुपेकर हिने केले. यावेळी अगत्य केटरर्सने तयार केलेल्या स्वादिष्ट्य फराळाचा सर्वांनी आस्वाद घेतला.