व्यंकटेश वैष्णव बीडशहरातील स्वस्त धान्य दुकान सुरू करण्याची परवानगी ज्या भागात आहे, त्या भागात स्वस्त धान्य दुकान सुरू न करता दुसऱ्याच जागेवर दुकाने सुरू केली आहेत. नियमानुसार स्वस्त धान्य दुकानदारांना असे करता येत नाही. याची दखल घेत तालुका पुरवठा विभागाने सोमवारी बीड शहरातील ६० दुकानदारांना नोटीस बजावली आहे.मागील सहा महिन्यांत बीड शहराच्या विविध प्रभागांतील गोरगरीब लाभार्थ्यांना स्वस्त धान्य मिळत नाही. याबाबत मोठ्या प्रमाणात तालुका पुरवठा विभागाकडे तक्रारी आलेल्या आहेत. बीड शहरात पुरवठा विभागाने स्वस्त धान्याची परवानगी देताना ज्या भागात दिली आहे, त्या ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने नसून दुकानदाराने आपल्या सोयीनुसार चक्क प्रभाग बदलून स्वस्त धान्य दुकाने सुरू केली आहेत.ही वस्तुस्थिती समोर आल्यानंतर पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार परवीन पठाण यांनी बीड शहरातील ६० स्वस्त धान्य दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.
परवानगी एका जागेची; दुकान दुसऱ्या जागेवर
By admin | Published: March 20, 2017 10:37 PM