छत्रपती संभाजीनगर : ‘पीईएस के सम्मान में.... हम सारे मैदान में’ असा नारा बुलंद करीत, गट-तट विसरून, हातात निळे झेंडे व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो धरून काढण्यात आलेल्या मोर्चाने शहरात जणू निळाईच अवतरली. ठरवून दिलेल्या घोषणा देत अत्यंत शिस्तीत हा प्रचंड मोर्चा दुपारी रणरणत्या उन्हात विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला.
तीन बाय तीस फुटांचे बाबासाहेबांचे संदेश असलेले ८ बॅनर मोर्चेकऱ्यांना देण्यात आले होते. समता सैनिक दलाने मानवंदना दिल्यानंतर मिलिंद चौकातून मोर्चा सुरू करण्यात आला. वाटेत मिलकॉर्नर चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास समता सैनिक दलाने अभिवादन केले. तर भडकलगेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास महिलांनी अभिवादन केले तर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास गायक-कलावंतांनी अभिवादन केले. डॉ. आंबेडकरांचा दहा फूट उंचीचा पुतळा व बाबासाहेबांच्या संदेशाचे फलक असलेला भीमरथ मोर्चाच्या अग्रभागी होता.
मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूल येथे सुमारे ८ हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या गोळ्या करण्यात येऊन निवेदनात जोडण्यात आले. १००० निळे झेंडे, ७०० विविध मागण्यांचे फलक व १०० सेव्ह पीईएस लिहलेले निळे ध्वज घेऊन लोक मोर्चात सहभागी झाले होते. पाचजणांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले. विभागीय आयुक्तांनी सर्व संबंधित विभागांना निवेदन पाठवून अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. मोर्चात ८ ते १० हजार लोकांची उपस्थिती होती. अत्यंत शिस्तबद्ध व संयमाने मोर्चा पार पडला.
विभागीय आयुक्तांच्या मार्फत राज्यपालांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातील मागण्या अशा:- गेल्या २५ वर्षंपासून धर्मादाय आयुक्त कार्यलाय, मुंबई येथे पीईएसच्या कार्यकारी मंडळाची प्रलंबित प्रकरणे तीन महिन्याच्या आत निकाली काढण्यात यावीत-छत्रपती संभाजीनगर येथे पीईएसच्या मालकी हक्काच्या जमिनीवर भूमािफयांनी केलेले अतिक्रमण त्वरित काढण्यात यावीत व संबंधितांवर फौजदारी गु्हे दाखल करण्यात यावेत- पीईएसच्या मालकी हक्काच्या जमिनीची सीमा, हद्द, खुणा यांची शासकीय मोजणी करण्यात यावी,-संस्थेच्या अंतर्गत वादामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची भरती थांबली असल्याने विशेष बाब म्हणून शासनाने भरतीचे आदेश निर्गमित करावेत-पीईएसचे शिक्षकेतर अनुदान तात्काळ देण्यात यावे, मिलकॉर्नर ते मिलिंद चौक, मिलिंद चौक ते विद्यापीठ गेट, पानचक्की ते डॉ. आंबेडकर लॉ कॉलेज या मार्गासाठी संस्थेच्या अधिग्रिहत केलेल्या जागेचा मोबदला म्हणून डीएमआयसीतील शैक्षणिक उद्देशासाठी राखीव शंभर एकर भूखंड संस्थेला देण्यात यावा-सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक योजनेअंतर्गत स्वतंत्र हेड करुन पीईएसच्या वसतिगृहासाठी निधी देण्यात यावा- पीईएसच्या विविध महाविद्यालयांमध्ये एस. पी. गायकवाड व सर्व संबंधितांनी केलेल्या कथित भ्रष्टाचार्ाची चौकशी करुनण दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.