शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

मराठा समाजास ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2020 12:57 PM

तर सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी २०१८ या कायद्याप्रमाणे मराठा समाजाला मिळणाऱ्या १२ टक्के आरक्षणला स्थगिती दिली आहे.

ठळक मुद्देखंडपीठाची राज्य शासनाला नोटीसपुढील सुनावणी येत्या शुक्रवारी होणार 

औरंगाबाद  :  मराठा समाजास आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या  १० टक्के आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी दाखल याचिकेच्या अनुषंगाने न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर. जी. अवचट यांच्या खंडपीठाने राज्य शासनास नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. यावर ६ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

औरंगाबाद येथील वेदांगी सुधाकर कापरे,  देवयानी ठोंबरे आणि कल्याणी देवानंद व्यवहारे या विद्यार्थिनींनी वैद्यकीय प्रवेशासाठी आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून अर्ज भरला आहे; परंतु मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या  आरक्षणाचा लाभ राज्यातील शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांतील प्रवेशाच्या जागांसाठी  घेता येणार नाही, असे निर्देश राज्य शासनाने  २८ जुलै २०२० च्या परिपत्रकाद्वारे  दिले आहेत. म्हणून ही याचिका दाखल केली आहे.

याचिकेत म्हटल्यानुसार राज्य शासनाने १० फेब्रुवारी २०१९  च्या शासन निर्णयाद्वारे मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे १० टक्के आरक्षण दिलेले आहे. तर  ३० सप्टेंबर २०२० च्या  मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये  मराठा समाजास आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे आरक्षण देण्यास स्थगिती दिलेली आहे. राज्य शासनाने मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाचे फायदे देण्यास स्थगिती दिली. तर सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी २०१८ या कायद्याप्रमाणे मराठा समाजाला मिळणाऱ्या १२ टक्के आरक्षणला स्थगिती दिली आहे. यामुळे मराठा समाजातील विद्यार्थी  प्रवेशापासून वंचित राहू शकतील, असे याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ