शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

पीएच.डी. प्रक्रिया; होणार उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:46 AM

आॅनलाइन पेट घेतल्यानंतर निगेटिव्ह गुणांकनावरून प्रशासनाला माघार घ्यावी लागली असतानाच प्रत्यक्ष संशोधनाला सुरुवात होण्यास विलंब लागणार असल्याचे स्पष्ट झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच. डी. प्रवेशासाठी ‘पेट-४’ परीक्षा घेतल्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा तीन महिन्यांत पेट-५ घेण्याची घोषणा कुलगुरूंनी केली होती. आॅनलाइन पेट घेतल्यानंतर निगेटिव्ह गुणांकनावरून प्रशासनाला माघार घ्यावी लागली असतानाच प्रत्यक्ष संशोधनाला सुरुवात होण्यास विलंब लागणार असल्याचे स्पष्ट झाले. पदव्युत्तर, एम.फिल. प्रवेश आणि अभियांत्रिकीच्या कॅरिआॅनमुळे हा उशीर होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.विद्यापीठाने पीएच.डी.च्या संशोधनासाठी घोषित केलेल्या पेट-४ परीक्षेला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. तरीही प्रत्यक्ष संशोधनाला सुरुवात झालेली नाही.सुरुवातीला पेट परीक्षा आॅनलाइन की आॅफलाइन यावरून गोंधळ उडालेला होता. १४ व १५ जुलै रोजी ही परीक्षा आॅनलाइन घेतल्यानंतर पाच दिवसांत निगेटिव्ह गुणांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला. या निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरल्यामुळे अनेक संघटनांनी तीव्र आंदोलने केली.या आंदोलनांमुळे प्रशासनाने माघार घेऊन निगेटिव्ह गुणांकन रद्द करून निकाल पुन्हा जाहीर केला. यास महिना उलटला तरी पुढील कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही. एका महिन्याच्या आत सर्व प्रक्रिया करून विद्यार्थ्यांच्या संशोधनाला सुरुवात होईल, असा दावा करण्यात आला होता. मात्र तो हवेतच विरला आहे. आता पदव्युत्तर प्रवेशाचा गोंधळ ३१ आॅगस्टपर्यंत संपण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर पुढील पाच ते दहा दिवस एम.फिल.ची प्रवेश प्रक्रिया चालेल. त्यानंतर सेट, नेट, एम. फिल., पाच वर्षांचा अनुभव असलेले प्राध्यापक आणि पेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे ‘आरआरसी’साठी नावनोंदणी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया १५ सप्टेंबरनंतर सुरू होणार असल्याचे विद्यापीठाच्या सूत्रांनी सांगितले.अनेकांची गाईडशिप जाणारनवीन नियमानुसार ज्या महाविद्यालयांमध्ये संशोधन केंद्र आणि पदव्युत्तरचा अभ्यासक्रम शिकविण्यात येत नाही, त्या ठिकाणी असलेल्या मार्गदर्शकांची गाईडशिप काढून घेण्यात येणार आहे. तसेच नवीन पात्रताधारकांना गाईडशिप लवकरच देण्यात येणार आहे.