लासूर स्टेशन : गंगापूर तालुक्यातील सिरेसायगाव येथील खळवाडीला अचानक आग लागल्याने दोन शेतकऱ्यांचा चारा जळून खाक झाला. ग्रामस्थांनी धाव घेऊन आग विझविण्यास मदत केल्याने पुढील अनर्थ टळला. यात सदर शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सिरेसायगाव येथील मस्जिदच्या पाठीमागे भाऊसाहेब रावसाहेब आळंजकर या शेतकऱ्याची खळवाडी आहे. या खळवाडीला गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. यात आळंजकर यांचे मकाचा खळवाडीला गुरुवार, १८ रोजी दुपारी अचानक आग लागली. या आगीमध्ये शेतकरी भाऊसाहेब रावसाहेब आळंजकर यांचा मकाचा चारा व दुसरे शेतकरी ज्ञानदेव तातेराव घोलप यांचा ज्वारीचा हजारो रुपयांचा चारा जळून खाक झाला. या दोन्हीही शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर ती विझविण्यासाठी गावातील गणेश जगताप, विलास नेमाने, बंडू जगताप, अशोक कोळेकर, दिलीप शेख, ज्ञानेश्वर अल्लाड, शौकत शेख, कार्तिक आळंजकर, किशोर नेमाने आदींनी प्रयत्न केल्याने पुढील अनर्थ टळला.
फोटो : सिरेसायगाव येथे शेतकऱ्यांच्या खळवाडीला लागलेली आग.
180321\img_20210318_161205_1.jpg
सिरेसायगव येथे शेतकऱ्यांच्या खळवाडीला लागलेली आग.