लातूर : मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या चार दिवसांत २० अर्ज दाखल झाले आहेत. ३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याचा कालावधी आहे. त्यामुळे सध्या इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करीत आहेत. ५ एप्रिल रोजी निवडणूक विभागाकडून अर्जांची छाननी केली जाणार आहे. छाननी पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी वैध अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ७ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची संधी आहे. त्यामुळे ७ एप्रिल रोजी मनपाच्या ७० जागांसाठी किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतात, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. सध्या निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी कामात व्यस्त आहेत. शहरात निवडणुकीसाठी नेमण्यात येणाऱ्या सहायक अधिकाऱ्यांना लागणारी वाहने, मतदान यंत्रे, बुथपर्यंत पोहोचविण्यासाठी लागणारी सुविधा आदी बाबींसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या जात आहेत.
७ एप्रिल रोजी होणार मनपा निवडणुकीचे चित्र स्पष्ट
By admin | Published: April 01, 2017 12:16 AM