शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

'पिंजण रुबी'मुळे पारव्यांचे अस्तित्वच धोक्यात; अंधश्रद्धेतून मांस, रक्ताचा मोठा व्यापार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 12:01 PM

जंगली कबुतर म्हणजेच 'पारवा' हा निसर्ग समतोलासाठी महत्त्वाचा पक्षी आहे.

- श्यामकुमार पुरेसिल्लोड : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्षी हा महत्त्वाचा घटक असून, पक्षघात अथवा पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीला कबुतरांचे मांस व रक्ताने मालिश आणि इंजेक्शन घेतल्याने फरक पडतो, या अंधविश्वासातूनही कबुतरांचा बळी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी कबुतरांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे.

जंगली कबुतर म्हणजेच 'पारवा' हा निसर्ग समतोलासाठी महत्त्वाचा पक्षी आहे. ग्रामीण भागात याच पारव्याचा पक्षघात -लकवा-पॅरालिसिस या आजारावर उपचारासाठी अघोरी पद्धतीने सर्रास वापर केला जातो. रानटी कबुतराचे रक्त व मांस गरम प्रकृतीचे असते. त्यामुळे लकवा बरा करण्यासाठी पारव्यांचा जीव घेतला जात आहे. या कबुतरांच्या पायातील जुगुलर व्हेनमधून रक्त काढले जाते व ते गोठण्याच्या आतच ते लकवा झालेल्या व्यक्तीच्या कमरेत स्नायूमध्ये इंजेक्शनने टोचले जाते. अवघ्या २ मिनिटांच्या आतच या पक्षाचे रक्त गोठते. त्यामुळे तत्सम वैदू व उपचारकर्ते घाईतच ते टोचतात. त्यातून अनेकदा गुंतागुंत ही उद्भवते. यास वैद्यकशास्त्रीय असा कुठलाही आधार नाही. बऱ्याच जणांना या रक्ताची ॲलर्जी ही होते. सोबत या पक्ष्याचे मांसही लकवाग्रस्त व्यक्तीस खाऊ घालतात तर याचे रक्त काढून लकवा झालेल्या भागात चोळले जाते. असे हे पक्षी अनेक कामी मारले जातात. रक्त वाळल्यावर अंगात ताठरपणा जाणवतो व हाच फायदा काहीजण समजतात. ही जंगली कबुतरे, मासे पकडण्याचे जाळे लावून पकडली जातात. विशेषतः विहिरीमध्ये ती अधिवास करतात. रात्री ती विहिरीत निवांत पडलेली असताना विहिरीवर जाळे टाकून, आवाज करून त्यांना पकडले जाते.

रक्ताचा अंगठीतील खड्यासाठी उपयोगकबुतराचे रक्त वाळल्यावर दगडासारखे टणक बनते व या वाळलेल्या रक्ताच्या खड्यांपासून पिजण रुबी जेम्स नावाचे रत्न (खडे) बनवले जातात. हे रत्न अंगठीमध्ये परिधान करणे भाग्यशाली समजले जाते, मात्र अनेक जंगली कबुतरे याकामी नाहक मारली जात आहेत.

ही तर अंधश्रद्धापक्षी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. मात्र, अंधश्रद्धेपोटी अनेक पक्ष्यांची शिकार होत आहे. अभिनव प्रतिष्ठानमार्फत आम्ही याबाबत जनजागृती करीत आहोत. आजपर्यंत शिकाऱ्याच्या तावडीतून अनेक पक्षी सोडविले आहेत. याकडे वनविभागाने लक्ष दिले पाहिजे. नागरिकांनीही लकव्यावर वैद्यकीय उपचार घ्यावेत, विनाकारण पक्ष्यांचा बळी घेऊ नये.- डॉ. संतोष पाटील, वन्यजीव अभ्यासक, सिल्लोड

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादforestजंगल