शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

सात वर्षांपासून प्रलंबित पैठण-पंढरपूर पालखी महामार्गासाठी जनहित याचिका

By प्रभुदास पाटोळे | Published: April 05, 2024 2:45 PM

केंद्र शासनासह सर्व प्रतिवादींना नोटिसा; पुढील सुनावणी २ मे रोजी अपेक्षित

छत्रपती संभाजीनगर : सुमारे ७ वर्षांपासून प्रलंबित असलेला पैठण-पंढरपूर पालखी राष्ट्रीय महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या अनुषंगाने न्या. आर. व्ही. घुगे आणि न्या. आर. एम. जोशी यांनी केंद्र शासनासह सर्व प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. या याचिकेवर २ मे रोजी पुढील सुनावणी अपेक्षित आहे.

सदरील मार्गाचे काम सुरू झाले तरी अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. रस्ते खोदल्यामुळे लोकांना धुळीचा व खड्ड्याचा त्रास होत आहे. अनेक ठिकाणी पूल पूर्ण झालेले नाहीत. पैठण-पंढरपूर मार्ग या भागातील लोकांच्या दळणवळणासाठी अत्यंत जवळचा व चांगला मार्ग ठरणार आहे. मुख्यतः वारकऱ्यांना पैठण ते पंढरपूर या वारीसाठी अत्यंत सुखकर मार्ग होणार आहे. परंतु, विविध कारणाने व संबंधित ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचे काम अपूर्ण आहे. पाटोदा येथील नागरिक महादेव नाना नागरगोजे तसेच हभप रामकृष्ण गणपतराव रंधवे, चक्रपाणी लक्ष्मणराव जाधव यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, बीडचे जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग माजलगावचे सहायक अभियंता यांना वारंवार निवेदने देऊन सदरील काम लवकरात लवकर करावे, अशी विनंती केली होती.

यापूर्वी या रोडसाठी काॅ. नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन व मोर्चेही काढण्यात आले होते. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी ऑगस्ट २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सदर काम अद्याप पूर्ण करण्यात आले नाही. यामुळे लोकांचे अतोनात हाल होत असल्यामुळे उपरोक्त तिघांनी ॲड. नरसिंह ल. जाधव यांच्यामार्फत खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ॲड. जाधव यांना ॲड. राकेश ब्राह्मणकर सहकार्य करीत आहेत.

सात वर्षांपूर्वी सुरू झालेले काम अद्याप अपूर्णचपैठण-पंढरपूर पालखी मार्ग २०१७ला राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाला. सदरील कामाच्या निविदा निघून काम सुरू करण्यात आले होते. सदरील ७५२ राष्ट्रीय महामार्ग पैठण, मुंगी, बोधेगाव, घोणसपारगाव, उखंडाचकला, बीड, सांगवी, शिरूर कासार, राक्षसभुवन, खोल्याचीवाडी, कारेगाव, डोंगरकिन्ही, चुंबळी, पाटोदा पारगावघुमरा, दिघोळला जोडला जाऊन पुढे तो खर्डा मार्गे पंढरपूरकडे जाणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठhighwayमहामार्ग