दुपारी दीड वाजता अचानक पंधरा मिनिटे जोरदार पाऊस कोसळला. यामुळे बाजारातील नागरिकांना धावपळ करत निवारा शोधावा लागला. यावेळी येथील शाळा सुटण्याची वेळ असल्याने, विद्यार्थ्यांची घर गाठताना दमछाक झाली. साडेतीन वाजता पुन्हा तासभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात गेलेले शेतकरी, मजूर व दूध काढून घरी येणारे नागरिक अंजना, खडकी आदी नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतात अडकून पडले होते. खडकी नदीच्या दोन्ही काठांवर दोरी बांधून अडकलेल्या अनेक जणांनी जीव धोक्यात घालून घर गाठले. नुकताच तयार केलेला नादरपूर पिंपरखेडा गावांना जोडणारा पर्यायी अर्धा पूल अंजना नदीला आलेल्या पुरात वाहून गेला. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना या पावसाचा फटका बसून प्रचंड नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत पाऊस चालू होता.
पिशोरला मुसळधार पावसाने पुन्हा झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 4:05 AM