सिल्लोड : गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतुसे विक्रीसाठी घेऊन फिरणाºया तालुक्यातील कासोद येथील तरुणाला गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता रेलगाव फाट्यावर पकडले.गजानन माधवराव कुमावत (२४, रा. कासोद) असे आरोपीचे नाव आहे. औरंगाबाद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विवेक जाधव, जमादार जोशी, देशमुख, गांगवे, तांदळे यांनी ही कारवाई केली. पोलिसांनी पिस्टल, काडतुसे असा ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि. विश्वास पाटील हे करीत आहेत. आरोपीला सिल्लोड न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. ३१) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पिस्टल बाळगणाऱ्या तरुणास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:00 AM