शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

‘दमरे’त ३७ पीटलाईन, सर्व निकष पूर्ण करूनही औरंगाबादेत ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 1:59 PM

नवीन करा अथवा जुन्या पीटलाईनचा विकास करण्याची मागणी

ठळक मुद्देनव्या रेल्वे सुरू होण्यास अडचण  जुनी पीटलाईन अनेक वर्षांपासून बंद

- संतोष हिरेमठ औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेतील विविध विभागांमध्ये तब्बल ३७ ठिकाणी पीटलाईन आहेत; परंतु वर्षानुवर्षे मागणी करूनही जागेचे कारण पुढे करून औरंगाबादेत पीटलाईन करण्याला ‘खो’ दिला जात आहे. परिणामी, देखभाल-दुरुस्तीसह औरंगाबादहून नव्या रेल्वे सुरू होण्यास अडचण येत आहे.

मराठवाड्याची आणि पर्यटनाची राजधानी, औद्योगिक, शैक्षणिक केंद्र असलेले औरंगाबाद मर्यादित रेल्वे जाळ्यांमुळे मागे पडत आहे. औरंगाबादहून विविध शहरांसाठी नवीन रेल्वे सुरू करण्याची सातत्याने मागणी केली जात आहे. सध्या शहरातून मुंबईला जाण्यासाठी जनशताब्दी, देवगिरी, नंदीग्राम आणि तपोवन एक्स्प्रेस आहे. या रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रवाशांची गर्दी पाहता मुंबईसह देशातील शहरांसाठी रेल्वे सुरू होणे गरजेचे आहे; परंतु पीटलाईन नसल्याचे कारण पुढे करून रेल्वे सुरू करण्यास अडचण असल्याचे सांगितले जाते. औरंगाबाद अथवा चिकलठाणा येथे पीटलाईन झाल्यास लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यासाठी हालचालीही झाल्या. चिकलठाण्यात २० बोगींची पीटलाईन करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र, पीटलाईनचा प्रस्ताव अपुरी जागा, पाणी यासह अनेक कारणांनी मागे टाकण्यात आला.एकीकडे नवीन पीटलाईन केली जात नाही. दुसरीकडे औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील जुनी पीटलाईन अनेक वर्षांपासून बंद आहे. किमान ती तरी कार्यान्वित करण्याची मागणी रेल्वे संघटनांकडून होत आहे. 

जागेअभावी अशक्यदमरेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा म्हणाले, जागेअभावी पीटलाईन करणे अशक्य होत आहे. नव्या रेल्वेसाठी पीटलाईनचा कोणताही अडथळा नाही. मात्र, प्रवासी संख्या वाढली तर नव्या रेल्वे सुरू होतील.

नांदेड विभागात ४ पीटलाईननांदेड विभागात नांदेड येथे ३, पूर्णा येथे १ पीटलाईन आहे, तर हैदराबाद, सिंकदराबाद, काचिगुडा, विजयवाडा, गुंटूर आदी ठिकाणी एकूण ३७ पीटलाईन आहेत. मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर म्हणाले की, नव्या रेल्वेंसाठी पीटलाईन होणे गरजेचे आहे. विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य भावेश पटेल म्हणाले, नवीन अथवा जुनी पीटलाईन सुरू केली पाहिजे. लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा के ला पाहिजे.

निकष पूर्ण करणारे शहर‘दमरे’च्या मुख्यालयाकडून २०१७ मध्ये पीटलाईनला मंजुरी मिळाली होती; परंतु पुढे ती अडवली गेली. संपूर्ण दमरे झोनमध्ये औरंगाबाद हे दुसरे सर्वात मोठे शहर आहे. औरंगाबाद शहर पीटलाईनसाठीचे सर्व निकष पूर्ण करते. ‘दमरे’मध्ये ३७ ठिकाणी पीटलाईन आहेत, असे बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थेतील संशोधक स्वानंद सोळंके म्हणाले.

टॅग्स :railwayरेल्वेAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनRailway Passengerरेल्वे प्रवासीAurangabadऔरंगाबाद