शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

आरक्षण ‘ड्रॉ’नंतर आराखडा; बोगस प्रभाग रचनेची सोशल मीडियात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 4:47 PM

आयोगाच्या अत्यंत गोपनीय कारभाराला छेद देण्याचे काम सोशल मीडियावर सुरू आहे.

ठळक मुद्देडिसेंबरअखेरपर्यंत आयोग महापालिकेला वॉर्ड आरक्षणासाठी ड्रॉ घ्या, असा आदेश देणार आहे.प्रारूप आराखडा तयार करताना आयोगाच्या नियमाप्रमाणे प्रचंड गोपनीयता.निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेचा कोणताही आराखडा अधिकृतपणे प्रसिद्ध नाही.

औरंगाबाद : महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल २०२० मध्ये घेण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोग प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्यासाठी तयारी करीत आहे. महापालिकेने तयार करून दिलेला प्रभाग रचनेचा आराखडा अद्याप आयोगाने प्रसिद्ध केला नाही. डिसेंबरअखेरपर्यंत आयोग महापालिकेला वॉर्ड आरक्षणासाठी ड्रॉ घ्या, असा आदेश देणार आहे. त्यानंतर आराखडा प्रसिद्ध होणार आहे. या प्रक्रियेपूर्वीच आयोगाच्या अत्यंत गोपनीय कारभाराला छेद देण्याचे काम सोशल मीडियावर सुरू आहे. प्रभाग रचनेचा बोगस आराखडा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना सादर केला. या समितीने आराखडा आयोगाकडे पाठवून दिला आहे. प्रारूप आराखडा तयार करताना आयोगाच्या नियमाप्रमाणे प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आयोग सध्या आराखड्यावर काम करीत आहे. त्यामध्ये किंचित फेरबदल आयोगाकडून अपेक्षित आहेत. २०११ च्या जनगणनेला डोळ्यासमोर ठेवूनच प्रभाग रचनेचा आराखडा तयार केला आहे. एक प्रभाग तयार करताना किमान ४० हजार लोकसंख्या गृहीत धरली आहे. १ हजार लोकसंख्येचा एक ब्लॉग असतो. एखाद्या प्रभागात लोकसंख्या जास्त होत असल्यास एक किंवा दोन हजारांचा ब्लॉग दुसऱ्या प्रभागात टाकण्याची मुभा आहे, असेही सूत्रांनी नमूद केले. एकीकडे राज्य निवडणूक आयोगाचे काम सुरू आहे. लवकरच महापालिकेला वॉर्ड आरक्षणाची सोडत काढण्याचा कार्यक्रम आयोगाकडून मनपाला देण्यात येणार आहे. सोडत काढल्यावर लगेच प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध होईल. वॉर्ड आरक्षण आणि प्रभाग रचनेवर सूचना-हरकती स्वीकारण्यात येणार आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर मागील तीन दिवसांपासून एक यादी चांगलीच धुमाकूळ घालत आहे. या यादीत प्रभाग रचना कशी असेल यावर भर देण्यात आला आहे. २०१५ मध्ये मनपाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रातील वॉर्डांच्या पूर्व-पश्चिम दिशा, हद्द, वॉर्डात समावेश होणाऱ्या वसाहती जशास तशा कॉपी करून टाकण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या बोगस प्रभाग रचनेच्या आराखड्यात अनेक वॉर्डच गायब करण्यात आले आहेत. याची सत्यता तपासण्यासाठी पत्रकारांनी मनपाच्या निवडणूक विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी नमूद केले की, सोशल मीडियावर फिरणारी यादी बोगस आहे. ही यादी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी आहे.

आयोगाकडून प्रभाग रचना प्रसिद्ध नाहीराज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेचा कोणताही आराखडा अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. लवकरच तो प्रसिद्ध होईल. आयोगाकडून अधिकृतपणे वॉर्ड आरक्षणाची सोडत काढण्यासाठी पत्र येईल, त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.- मंजूषा मुथा, उपायुक्त, मनपा.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग