औरंगाबाद : सूर्यमालेतील तांबूस ग्रह मंगळ २२ मे रोजी पृथ्वीच्या प्रतियुतीत येणार आहे. त्यानंतर ३० मे रोजी पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार असल्याने खगोलप्रेमींना या ग्रहाच्या निरीक्षणाची संधी मिळणार आहे.३० मे रोजी मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ असताना दुर्बिणीतून त्याचा आकार हा १८.६ कोणीय सेकंद एवढा मोठा दिसणार आहे. यापूर्वी मंगळ ग्रह ३ आॅगस्ट २००३ रोजी ५० हजार वर्षांतील सर्वात जवळ आला होता, तर ३१ जुलै २०१८ मध्ये ३० मे २०१६ च्या पेक्षाही अधिक जवळ असणार आहे. त्याचा आकार २४.६ कोणीय सेकंद एवढा असणार आहे; परंतु यावेळी आपल्याकडे पावसाळा राहणार असल्याने २०१८ मधील ही घटना पाहायला भेटणे अवघड होणार आहे. यामुळे ३० मे रोजी मंगळ ग्रह निरीक्षणाची संधी खगोलप्रेमींना मिळणार आहे, अशी माहिती एमजीएमचे खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे (नांदेड) संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.
मंगळ ग्रह येणार पृथ्वीच्या जवळ
By admin | Published: May 22, 2016 12:26 AM