खुलताबाद (औरंगाबाद ) : खुलताबाद तालुक्यातील धामणगाव ,तीसगाव, निरगुडी शिवारातील वन विभागाच्या जमिनीवर अनेक वर्षांपासून अनेक शेतकरी अनधिकृत शेती करत होते. अशी १३० हेक्टर जमीन वनविभागाने नुकतीच ताब्यात घेतली. या जमिनीवर आता वनविभाग 'इको बटालियन' च्या सहाय्याने वृक्षलागवड करणार आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते आज या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
अनेक वर्षापासून या भागातील वन विभागाच्या जमिनीवर शेतकरी अनधिकृतपणे शेती करत होते. या प्रकरणी वन विभागाने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने वन विभागाच्या बाजूने निकाल दिला. यानंतर वनविभागाने या जमिनी ताब्यात घेण्याची कारवाई केली. तसेच पावसाळ्यापूर्वीच येथे वृक्षारोपण करण्यासाठी खड्डे खोदण्यात आली. दरम्यान, विभागाने येथील 'इको बटालियन' ताब्यात हे संपूर्ण क्षेत्र दिले आहे. आता इको बटालियन येथील वृक्षारोपणावर देखरेख ठेवत आहे.