शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

मसापचे यंदा अमृतमहोत्सवी वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 1:10 AM

यंदा २९ सप्टेंबरला मराठवाडा साहित्य परिषद ७४ वर्षे पूर्ण करून ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : २९ सप्टेंबर १९४३ रोजी मराठवाडा साहित्य परिषदेची स्थापना झाली. यंदा २९ सप्टेंबरला मराठवाडा साहित्य परिषद ७४ वर्षे पूर्ण करून ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त वर्धापन दिनाचा कार्यक्रम उस्मानाबाद येथे घेण्यात येत आहे.यानिमित्त वाङ्मय पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून, अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम घेतले जातील, अशी माहिती साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि कार्यवाह दादा गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.या कार्यक्रमातच हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक संतराम शहापुरे आणि तुकाराम ढवळे यांचाही परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. ख्यातनाम साहित्यिक डॉ. गो.मा. पवार यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती असेल. तसेच हिंदी-मराठी साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. वेदकुमार वेदालंकार यांचीही याप्रसंगी विशेष उपस्थिती असेल. साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेला उस्मानाबाद नगर परिषदेने दहा हजार चौरसफूट जागा दिली असून, या जागेवर लवकरच संत गोरोबा काका सभागृह उभारले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे अध्यक्ष पी.डी. पाटील यांच्या हस्ते या जागेचे भूमिपूजन होईल. याप्रसंगी मधुकरराव मुळे यांना परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.तसेच दि.२४ व २५ डिसेंबर रोजी अंबाजोगाई येथे ३९ वे मराठवाडा साहित्य संमेलन होणार असून, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कादंबरीकार प्रा. रंगनाथ तिवारी असतील. यादरम्यान मराठी शिक्षकांसाठी शाखा संमेलनही होणार आहे.हिंदीतील युगप्रवर्तक साहित्यिक गजानन माधव मुक्तिबोध यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या साहित्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दि.८ आॅक्टोबर रोजी मराठवाडा साहित्य परिषदेत हा कार्यक्रम होईल. हिंदी व मराठी भाषेचे जाणकार विष्णू खरे यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन होईल. याशिवाय विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या साहित्याचे पुनर्वाचन कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस असल्याचेही ठाले पाटील यांनी सांगितले.