शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
3
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
4
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
5
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
6
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
7
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
9
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
10
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

कोरोनासोबत न्यूमोनिया ठरतोय धोकादायक; जिल्ह्यात १० दिवसांत ४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

By ओमकार संकपाळ | Published: July 08, 2022 1:04 PM

उपचारात ऑक्सिजनची पडतेय गरज; न्यूमोनियाच्या रुग्णांची कोरोनाची प्राधान्याने चाचणी व्हावी, असा सूर वैद्यकीय क्षेत्रातून उमटत आहे

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा विळखा वाढत आहे. या सगळ्यात कोरोनासोबत न्यूमोनिया असणारे रुग्ण समोर येत आहे. कोरोनाबरोबर न्यूमोनिया रुग्णांसाठी धोकादायक ठरू पहात आहे. जिल्ह्यात १० दिवसांत ४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. त्यातील रुग्णांना न्यूमोनिया असल्याचे आढळून आले. त्यामुळे तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त होत आहे.

पावसामुळे मलेरिया, डेंग्यू डोके वर काढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या सगळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या सर्दी, ताप, खोकला आणि तापाच्या रुग्णांची सरकारी रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये गर्दी होत आहे. व्हायरल फिव्हरने लहान मुलांपासून ज्येष्ठ बेजार होत आहेत. न्यूमोनियाचे रुग्णही वाढत आहेत. न्यूमोनियाच्या रुग्णांपैकी काहींना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे न्यूमोनियाच्या रुग्णांची कोरोनाची प्राधान्याने चाचणी व्हावी, असा सूर वैद्यकीय क्षेत्रातून उमटत आहे. सध्या लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे परंतु जे गंभीर रुग्ण येत आहे, त्यांना काेरोनासह न्यूमोनिया आणि इतर सहविकृती असल्याचे आढळून येत आहे.

पाच दिवसांवर ताप तर...कोरोनाच्या रुग्णांमध्ये न्यूमोनियाही आढळून येत आहे. अशा रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडत आहे. कोरोनाच्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नये. पाच दिवसांपेक्षा अधिक दिवस ताप असेल तर वेळीच काळजी घ्यावी, वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे घाटीतील मेडिसिन विभागप्रमुख डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य म्हणाल्या.

न्यूमोनियाचे दुष्परिणाम-अशक्तपणा येणे.- फुप्फुसांमध्ये पाणी किंवा पस भरणे.- श्वासोच्छ्वास घेताना त्रास होणे, तो अपुरा पडणे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद