लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गणेश चतुर्थीपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली असून रविवारी जिल्ह्यातील बीड, आष्टी व पाटोदा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मांजरसुंबा, नेकनूरसह बालाघाटावरील पावसामुळे बिंदुसरा मध्यम प्रकल्प सोमवारी दुपारी पूर्ण भरला. धरणक्षेत्रात पाऊस झाला तर बीडमधून जाणाºया बिंदुसरा नदी परिसरात पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेत प्रशासनाने उपाययोजना सुरु केल्या आहेत.रविवारी बीड तालुक्यातील मांजरसुंबा मंडळात ७८ मि.मी., नेकनूर ७२, पाटोदा तालुक्यातील थेरला मंडळात ८५ मिमी तर अंमळनेर मंडळात ७६ मिमी, आष्टी तालुक्यातील धामणगाव मंडळात ७६ मिमी पावसाची नोंद झाली. ही पाच मंडळे वगळता जिल्ह्यात रविवार व सोमवारी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी सूर्यदर्शन झाले नाही.मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २१.१० मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत एकूण ४४०.६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६६६.३६ मिमी आहे. या तुनलेत यंदा आतापर्यंत ६६.१२ टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी १ जून ते २८ आॅगस्ट कालावधीत ३१८.७० मिमी पाऊस झाला होता.सोमवारी रात्रीही अंबाजोगाई, नेकनूर, धारुर, बीड परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
बिंदुसरेचा धोका वाढला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:40 AM